jalna accident 
मराठवाडा

पहिली ग्रामपंचायत बैठक ठरली शेवटची...! अपघातात ग्रामपंचायत महिला सदस्या जागीच ठार

दीपक सोळंके

भोकरदन(जालना): जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या आन्वापाडा येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत महिला सदस्याचे सोमवारी (ता.22) दुपारी अपघाती निधन झाले. विशेष म्हणजे सोमवारी त्यांनी निवडणूकी नंतर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित पहिल्या बैठकीला उपस्थिती लावली होती. त्यांनतर विवाह सोहळ्यासाठी त्या पतीसह दुचाकीने जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.

त्यामुळे त्यांची सोमवारची पहिली बैठक शेवटची ठरल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनिता गणेश सोनवणे (वय 32) असे या घटनेतील मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यात महिनाभरापूर्वी ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या आहे. त्यात तालुक्यातील आन्वापाडा ग्रामपंचायतीचीही निवडणूक झाली. या निवडणुकीत येथे सध्या सत्ताधारी असलेल्या पॅनलच्या विरोधात येथील अनिता गणेश सोनवणे या एकमेव महिला सदस्य विरोधी पॅनल कडून विजयी झाल्या होत्या.

ग्रामपंचायत निवडणूकीनंतर सोमवारी ग्रामपंचायतीची पहिलीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला त्यांनी उपस्थिती लावली. बैठक संपल्यानंतर पती गणेश सोनवणे यांच्यासह त्या बुलढाणा जिल्ह्यातील साखळी येथे एका विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने जात असताना माळवंडी गावाजवळ झालेल्या अपघातात अनिता सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती गणेश सोनवणे जखमी झाले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT