jalna sakal
मराठवाडा

Jalna Accident News : ट्रॅव्हल्सला अपघात; 20 ते 25 प्रवासी जखमी

ट्रॅव्हलचालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅव्हल्स पुलाखाली जाऊन कोसळली.

उमेश वाघमारे

जालना - जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मात्रेवाडी शिवारात येथे ट्रॅव्हलचालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅव्हल्स पुलाखाली जाऊन कोसळली. या अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाले असून चार प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (ता. 25) मध्यरात्रीनंतर झाला आहे.

पुणे येथून नागपूरकडे एक ट्रॅव्हल्स वीस ते पंचवीस प्रवासी घेऊन निघाली होती. सोमवारी (ता. 25)मध्यरात्रीनंतर छत्रपती संभाजीनगर -जालना महामार्गावरील बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारात या ट्रॅव्हल चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे अनियंत्रित झालेले ट्रॅव्हल्स महामार्गालगत असलेल्या छोट्याशा पुलाखाली जाऊन कोसळली.

या अपघातात वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली बचाव कार्य करत प्रवाशांना तत्काळ जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

जखमी प्रवाशांमध्ये अमन कुमार (वय १९, मध्यप्रदेश), अनिता इंगोले ( वय ३५), शहाबज खान, रवींद्र राजे (वय ३३), रितेश चंदेल (वय २३), पराग शिंगणे (वय ४२, नागपूर), निकेल मानिजे (वय २३, वर्धा), किरण मांटुळे (वय ३८, यवतमाळ), संभाजी सासणे (वय ३२ यवतमाळ), मधुकर पोहरे (वय ४०, अमरावती), गणेश भिसे (वय ३७, यवतमाळ), मोहम्मद सैफुद्दीन (वय ३० ), सागर उपाय्या (वय ९, मध्य प्रदेश), वर्षा नागरवाडे (वय ४०, यवतमाळ), शुभम हत्तीमारे (वय २७, गोंदिया)

या १५ जखमींवर जालना येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.जखमींना पोलिस निरीक्षक सुदाम भागवत, पोलिस कर्मचारी गोविंद डोभाळ, प्रताप जोनवाल, जऱ्हाड, चालक ठाकूर, महिला पोलिस कर्मचारी जया नागरे यांनी मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात ₹69,000 किमान वेतनासह जुनी पेन्शन योजनेचा प्रस्ताव

Petrol Diesel Rates update : पेट्रोल -डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका

खऱ्या आयुष्यातही सगळ्यांशी तुसडेपणाने वागतो समीर परांजपे; बायकोचा खुलासा, म्हणाली, 'आताची भूमिका सेम टू सेम'

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT