Ambad News

 

sakal

मराठवाडा

Ambad News: अंबडमध्ये दुमजली इमारत कोसळली; दोनजण जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

Century-Old Double-Storey Building Collapses in Ambad’s Natharekar Chowk: अंबडमध्ये शंभर वर्ष जुनी इमारत कोसळली; दोनजण जखमी, रिक्षाचे नुकसान शहरातील नाथरेकर चौकात भीषण प्रसंग! दुमजली इमारत कोसळून थरार..

सकाळ वृत्तसेवा

अंबड: जालना जिल्हयातील अंबड शहरातील नाथरेकर चौकातील शंभर वर्ष जुनी असलेली दुमजली इमारत शनिवारी सकाळी अचानक कोसळली बाजूलाच किराणा दुकानाचे गोडाऊन आहे. यातील दोघे पायाला मार लागल्याने किरकोळ जखमी झाले. तर रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ऑटो रिक्षावर इमारतीचा ढिगारा पडल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले.

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाथरेकर चौकातील शेकडो वर्षापूर्वी बांधलेली दुमजली इमारत अत्यंत जीर्ण व मोडकळीस आली होती, हि इमारत सोडाणी यांच्या मालकीची आहे.

सोडाणी यांचे वास्तव्य सध्या छत्रपती संभाजीनगर येथे असल्याने या इमारतीमध्ये कोणी वास्तव्यास नव्हते. यामुळे होणारी दुर्घटना टळली आहे. खरतर शहरातील जुनाट व धोकादायक इमारतीला पालिका ने इमारत पाडण्यासाठी नोटिसा, सूचना काढणे आवश्यक आहे. जेणे करून जुनाट व धोकादायक इमारती वेळीच पाडल्यास पुढील होणारा धोका रोखण्यासाठी मदत होऊ शकते.

अंबड शहरात अनेक जुनाट व धोकादायक इमारती:

अंबड शहरातील अनेक भागात गेल्या अनेक वर्षापासून बांधलेल्या जुनाट व धोकादायक इमारती आहेत. नगर पालिकेने शहरातील वेगवेगळ्या भागातील मुदत संपलेल्या व जुनाट व धोकादायक इमारतींचा सर्व्हे करुण धोका टाळण्यासाठी वेळीच पुढाकार घेणे काळाची गरज बनली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

Bihar Laborer Killed in Sangli : मित्रानेच काढला काटा! जुन्या धामणीत नदीकाठी बिहारी मजुराचा धारदार शस्त्राने चिरला गळा; सांगलीत 72 तासांत पाचवा खून

Pune News: हिंजवडीत दूषित पाणी पिण्याची नामुष्की; सोसायट्यांमधील स्थिती, शुद्धीकरणानंतरही दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

Who is Sameer Rizvi: वडिलांना ब्रेन हॅमरेज... CSK ची ८ कोटीची बोली अन् आता DC साठी गाजवतोय मैदान, जाणून घ्या समीरची कहाणी

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

SCROLL FOR NEXT