bank bank
मराठवाडा

शेतकरी मारहाण प्रकरण; SBI बँकेसमोर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

येत्या 25 जूनला पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे

दीपक सोळंके

भोकरदन (जिल्हा जालना): भोकरदन (Bhokaradan) शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरुवारी (ता.17) पीक कर्जासंदर्भात विचारणा करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला बँकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आज शुक्रवारी (ता.18) सकाळी संतप्त शेतकऱ्यांसह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्यावतीने मारहाण करणाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी बँकेसमोर ठिय्या आंदोलन केले.

तालुक्यातील गव्हाण संगमेश्वर येथील शेतकरी गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पीक कर्जासंदर्भात विचारणा करण्यासाठी भोकरदन शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेला होता. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे बँकेचा व्यवहार बंद असल्याने बँकेचे गेट बंद करण्यात आले होते. संबंधित शेतकऱ्यांने गेटमधून विचारणा केली असता. बँकेतील काही अधिकारी व कर्मचारी भडकले व त्यांनी संबंधित शेतकऱ्याला शिवीगाळ करून नंतर बँकेबाहेर येऊन बेदम मारहाण केली असल्याचा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या प्रकारामुळे शेतकऱ्यांसह अनेक पक्ष व सामाजिक संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात आला. शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देऊन मारहाण करणाऱ्या बँकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवारी (ता.18) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियासमोर संतप्त शेतकऱ्यांसह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी ठिय्या आंदोलन केले.

यावेळी दिलेल्या निवेदनावर शिवसेनेचे तालुका संघटक महेश पुरोहित, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विष्णू गाढे, नानासाहेब वानखेडे, विशाल गाढे, राजेश साबळे, दिनेश पडोळ, गजानन गावंडे, विनोद मिरकर, आप्पासाहेब जाधव, श्रीमंता राऊत, सुरेश तळेकर, विकास जाधव, नारायण लोखंडे, मधुकर ढोले, विलास राऊत, ईश्वर इंगळे, अमोल जाधव, गणेश इंगळे, बबन जंजाळ, महेश औटी, कृष्णा तराळ, नारायण जिवरग यांच्यासह आदींच्या स्वाक्षरी आहेत.

25 जूनला शोले स्टाईल आंदोलन-

दरम्यान मारहाण प्रकरणाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले असून, मारहाण करणाऱ्या बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करा. अन्यथा येत्या 25 जूनला पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

'त्या' प्रभारी व्यवस्थापकावर गुन्हा दाखल-

शेतकरी मारहाण प्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रभारी व्यवस्थापक इम्रान पठाण यांच्याविरुद्ध मारोती सहाणे या शेतकऱ्याने भोकरदन पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : पदवीधरांचा कौल सरकारविरोधात; धोरणांबद्दल तरुणांची नाराजी, दुष्काळी मदतीची पाच हजारांची रक्कम अपुरी

मोठी बातमी! INDIA आघाडीच्या महारॅलीला अभिजीत दीपके यांचा पाठिंबा; ‘GYANU MUST GO’ म्हणत पोस्ट, नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: ''महाराष्ट्रात आणखी २३ प्रकल्प येत आहेत.. भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड टेंडरशिवाय'', राज ठाकरेंची कर्जतमध्ये सभा

MLA Harshada Deshmukh : एमपीएससीतील पारदर्शकतेसाठी प्रयत्न करणार; रोजगार, शिक्षणाच्या प्रश्नांवरही देणार भर

Raj Thackeray Karjat tree cutting visit : "गुजरातमधल्या एका कंपनीसाठी हा सारा खटाटोप!"; कर्जतच्या जंगलात स्वतः उतरताच राज ठाकरेंचा सरकारवर थेट वार, सभेत तोफ धडाडणार!

SCROLL FOR NEXT