रस्त्यावरील पूल बंद sakal
मराठवाडा

भोकरदनच्या नदीला पूर, जाफ्राबाद, आलापूर रस्त्यावरील पूल बंद

भोकरदन शहरासह तालुक्यात सोमवार (ता.28) रात्री अकरा वाजेपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

भोकरदन (जि. जालना) : भोकरदन शहरासह तालुक्यात सोमवार (ता.28) रात्री अकरा वाजेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या केळणा नदीला मोठा पूर आला असून, या नदीवरील जाफ्राबाद मुख्य रस्त्यावरील पूल व आलापूर कडे जाणारा सिमेंट पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. परिणामी अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला वाट पाहायला लावणाऱ्या पावसाने आता गत काही दिवसांपासून तालुक्यात मुक्काम ठोकला असून, अधूनमधून पावसाचा जोर अधिक वाढत असल्याने तालुक्यात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील गिरीजा, पूर्णा, केळणा, रायघोळ, जुई नद्या दुथडी भरून वाहत आहे. त्यात सोमवारी रात्री पासून देखील मुसळधार पाऊस सुरू असल्याने भोकरदन शहरातून वाहणाऱ्या केळणा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे शहरातून जाफ्राबादकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. परिणामी विदर्भातील अकोला, खामगाव, बुलढाण्यासह तालुक्यातील अनेक लहान मोठ्या गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. तसेच शहरातून आलापूर कडे जाणाऱ्या सिमेंट पुलावरून देखील पुराचे पाणी सुरू असल्याने आलापूर, उस्मानपेठ, गोकुळ, प्रल्हादपूर, वाडी आदी भागाचा शहराशी संपर्क तुटला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

Junnar News : जुन्नर शहरात श्री तुळजाभवानी माता पलंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT