Jalna Breaking News Girl Boy Committed Suicide Before Railway 
मराठवाडा

प्रेमाचा धक्कादायक शेवट! तरुण-तरुणीची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

जालना : औरंगाबाद येथून हैदराबादकडे जाणाऱ्या कांचनगुडा एक्स्प्रेस जालना तालुक्यातील दरेगाव शिवारात आली असता सोमवारी (ता.१५) सायंकाळी तरुण-तरुणीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. मृत तरुणीचे नाव शीतल शरद कान्हे (वय १९) असून ती अंबड तालुक्यातील पांगारखेडा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तर मृत तरुणाचे नाव तुषार प्रेमानंद रगडे (वय २०) असून तो चंदनझिरा भागातील राहणारा आहे, अशी ओळख त्या दोघांच्या आधार कार्डवरुन पटली आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी रात्री उशिरा चंदनझिरा पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. या तरुण-तरुणीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मात्र ती प्रेमप्रकरणातून झाली असेल असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! घरगणनेच्या काळातच शिक्षकांची ‘टीईटी’; २१ जूनला होणार शिक्षक पात्रता परीक्षा; २७ मार्च ते १६ एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज

Merchant Abducted : दीड कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; अपहृत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका, पाच आरोपींना अटक

Solapur News : सावळेश्वर टोलनाका पुन्हा वादात! चालकाला रक्तबंबाळ करेपर्यंत मारले; पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

Pune University : पुणे विद्यापीठाला अखेर मिळाले कुलसचिव; छुप्या पद्धतीने नियुक्ती केल्याचा संघटनांचा आरोप

Pune News : विना अडथळा खोदकाम करता येणार; पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश

SCROLL FOR NEXT