jalna news. 
मराठवाडा

मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्याची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात केलं दाखल

दिलीप पवार

अंकुशनगर (जालना): साष्टपिंपळगाव येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोनलनातील एका उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. त्याला शुक्रवारी (ता. २९) पहाटे पाच वाजता शहागड येथील एका खासगी रूग्णालयात त्यांना  हलविण्यात आले आहे.

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाची दखल न घेतल्याने प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषणाला बसलेल्या दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती  ता. २८ जानेवारी रोजी खालावली होती.

मागील तीन दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आमरण उपोषण आंदोन करत असलेल्या ६५ वर्षीय मुक्ताबाई ढेपे, मनोज जरांगे, संतोष ढवळे व बाबासाहेब वैद्य यांच्यापैकी  मनोज जरांगे, बाबासाहेब वैद्य यांची ता.२८ जानेवारी रोजी प्रकृती  खालवली होती. खासगी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. मात्र,ता. २९ जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता उपोषणकर्ते बाबासाहेब वैद्य यांचा बीपी वाढल्याने त्यांना ताबडतोब शहागड येथील एका खासगी रूग्णालयात हलविण्यात आले.

गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेले या ठिय्या आंदोलन व उपोषणाकडे सरकार व प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मराठा आंदोलक करत आहे. प्रशासनातील एकही अधिकारी या आंदोलनस्थळी आला नसल्याने आंदोलनकर्ते रोष व्यक्त करत  आहेत.

(edited by- pramod sarawale)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT