जालना : जालना रेल्वेस्थानकावर बाॅम्ब ठेवला असून येथे बाॅम्ब स्फोट होणार आहे, अशी अफवा पसरविणारा एक फोन काॅल जालना पोलिस कंट्रोल रूमला बुधवारी (ता.दहा) दुपारनंतर आल्याने पोलिसांची धाव झाली. या फोन काॅलची शहानिशा करण्यासाठी बाॅम्बशोधक पथकाने संपूर्ण रेल्वेस्थानक पिंजुन काढले. दरम्यान चुकीची अफवा पसरविणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जालना पोलिस कंट्रोल रूमला बुधवारी (ता.दहा) दुपारी रेल्वेस्थानकात बाॅम्ब असून येथे स्फोट होणार आहे, अशी माहिती कृष्णा त्रिंबक चव्हाण (रा.सेवली, ता.जालना) यांने अफवा पसरविणारा फोन काॅल केला. त्यानंतर पोलिस कंट्रोल रूमकडून ही माहिती तत्काळ कदीम जालना व बाॅम्ब शोधक पथकाला देण्यात आली. त्यानंतर बाॅम्ब शोधक पथक, कदीम जालना पोलिसांनी जालना रेल्वेस्थानकाचा संपूर्ण परिसर शोधला. त्यानंतर हा अफवा पसरविणारा फोन काॅल असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी सेवली पोलिसांना यासंदर्भात माहिती देऊन बाॅम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्या कृष्णा त्रिंबक चव्हाण याला ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
त्यानुसार सेवली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विलास मोरे यांनी कृष्णा त्रिंबक चव्हाण याला ताब्यात घेऊन कदीम जालना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. दरम्यान रेल्वेस्थानकावर बाॅम्ब असल्याची चुकीची माहिती पोलिसांना देणारा कृष्णा चव्हाण हा सेवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णावाहिकेवर चालक आहे. त्याला दारूचे व्यसन असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी रेल्वेस्थानकावर बाॅम्ब असल्याची चुकीची माहिती पोलिसांना दिल्यानंतर कृष्णा चव्हाण याने काही पत्रकारांनीही यासंदर्भात दूरध्वनी करून माहिती दिली होती.
संपादन - गणेश पिटेकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.