Crime Sakal
मराठवाडा

Crime : बायको गावाला गेली अन् नराधमाने वृद्ध सासूवरच केला आत्याचार

माणुसकीला काळीमा फासणारी घटना मराठवाड्यात घडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

जालना : जालना येथे आत्याचार केल्याची नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका नराधमाने बायको गावाला गेली असताना घरात कुणी नसल्याचा फायदा घेत आपल्याच सासूवर अत्याचार केला. जालना येथील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून सदर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदनझिरा परिसरातील एका गावातीत व्यक्तीची ६५ वर्षाची सासू लेकीकडे आणि जावयाच्या घरी राहते. तर ३८ वर्षीय जावई आणि तिची लेक एका शेतकऱ्यांकडे राखणदार म्हणून काम करतात. बुधवारी रात्री सदर वृद्धेची लेक नातेवाईकांकडे गेली होती.

ज्या दिवशी वृद्धेची लेक नातेवाईकांकडे गेली त्यादिवशी मध्यरात्री जावई दारू पिऊन घरी आला आणि झोपेत असलेल्या सासूवर आत्याचार केला. वृद्धेने प्रतिकार केला पण त्याने वृद्धेला मारहाण केली.

त्यानंतर सकाळी आपली मुलगी घरी आल्यावर वृद्धेने हा प्रकार आपल्या मुलीला सांगितला. तिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार झालेल्या आरोपीचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT