ST  Sakal
मराठवाडा

Jalna : एसटीला सतत आर्थिक ब्रेक

दररोज साडेचार लाखांचा बसतोय तोटा

सकाळ वृत्तसेवा

जालना : महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळ बारा महिने तोट्यात सुरू असल्याची ओरड होते. मात्र, राज्य शासनाकडून योजनांची घोषणेनंतर एसटीला वेळ निधी दिला जात नाहीत. आजघडीला एसटीतून सुमारे नऊ हजार प्रवासी मोफत प्रवास करतात, त्यामुळे प्रत्येक महिन्याला चार ते साडेचार लाखांचा फटका एसटीला बसत आहे. सतत आर्थिक ब्रेक बसत असल्याचे दिसत आहे. अशात दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना एसटीच्या अधिकारी, लिपिकांचे मागील महिन्याचे वेतनही झालेले नाही.

जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे चार आगार आहेत. या चार आगारातील अधिकारी, चालक, वाहक, लिपिक, एसटी दुरुस्ती अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक या सर्वांचे मिळून सुमारे साडेचार कोटी रुपयांचे दर महिन्याचे वेतन होते. त्या तुलनेत एसटीला दर महिन्याला ऑगस्ट महिन्यांपासून सुमारे सहा कोटी ६० लाखांचा महसूल मिळतो, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये बसच्या डिझेलवर सुमारे साडेचार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च होत आहे.

गेल्या ऑगस्ट महिन्यात अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या मोफत प्रवासाची घोषणा राज्य शासनाने केली. त्यानंतर आजघडीला जिल्ह्यात प्रत्येक दिवसाला सुमारे नऊ हजार प्रवासी मोफत प्रवास करत आहेत. त्यामुळे प्रत्येक दिवसाला चार ते साडेचार लाख रुपयांची प्रवासी वाहतूक रोज एसटी मोफत करत आहे. परिणामी राज्य शासनाकडून एसटीला ७५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक मोफत प्रवासी वाहतूक, ज्येष्ठ नागरिक अर्ध तिकीट, विविध पास सवलत योजनेचे सुमारे साडेतीन ते साडेचार लाख रुपये प्रतिदिन जिल्ह्याच्या वाट्याला येतात, असे अधिकारी सांगण्यात येत आहेत. मात्र, ही रक्कम शासनाकडून वेळेत मिळत नाही.

निधी उपलब्ध नसल्याने आजघडीला जिल्ह्यातील एसटीच्या काही अधिकारी, लिपिकांचे सुमारे २३ लाखांचे मागील महिन्याचे वेतन अजूनही झाले नाही. विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्यानंतरही मागील महिन्याचे वेतन झालेले नाही. त्यामुळे एसटीची तिजोरी पुन्हा रिकामी झाल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT