Jalna Crime News 
मराठवाडा

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने तीक्ष्ण हत्याराने पोटावर वार करून पत्नीला विहिरीत फेकून दिले

संजय राऊत

टेंभुर्णी (जि. जालना) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तीक्ष्ण हत्याराने पोटावर वार करून तिला विहिरीत ढकलून देत जीवे मारल्याची घटना हनुमंतखेडा  जाफराबाद)  येथे शनिवारी (ता.तीन ) घडली आहे. या प्रकरणी  पती मनोहर पाटीलबा भोपळे याला टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली आहे.  या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की हनुमंत खेडा  येथील मनोहर भोपळे यांनी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन शनिवारी (ता.3) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हनुमंतखेडा शिवारातील पांढरी नामक शेतात गोठ्या जवळ पत्नी अनिता मनोहर भोपळे (वय 36 ) हीच्या पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेतच पत्नीला उचलून विहिरीत फेकून दिले.

या प्रकरणी आरोपी मनोहर भोपळे यांचा मुलगा सतीश भोपळे यांच्या फिर्यादीवरून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच चार तासाच्या आत आरोपीला जाफराबाद बसस्थानकावरून पळून जात असताना पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर पायगन ,ज्ञानेश्वर साखळे,पंडित गवळी ,गजानन काकड, गजेंद्र भुतेकर धनंजय जगदाळे, प्रदीप धोंडगे, हरी क्षीरसागर यांनी आरोपीचा शोध घेत रात्री साडेअकरा वाजता जाफराबाद बस स्थानकातून ताब्यात घेतले दरम्यान रविवारी सकाळी भोकरदनचे उपविभागीय अधिकारी इंद्रसिंग बहुरे यांच्यासह क्राईम बॅचचे एपीआय राहुल शेजाळ,गणेश वाघ ,फॉरेन्सिक लॅब चे रवी खलसे, श्वान पथकातील स्वान लीली यांच्यासह संजय कुणाल वाल, सचिन पल्लेवड यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला मुलाच्या फिर्यादीवरून ती त्याचा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ज्ञानेश्वर साखळे करीत आहेत.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Nagpur Ganesh Visarjan: ड्रोनमधून ठेवणार गणेश विसर्जनावर नजर;६, हजार ४०० पोलिसांचा बंदोबस्त; १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT