jalna crime news murder of gram panchayat rozgar sevak at chorhala in bhokardan  Sakal
मराठवाडा

Jalna Crime News : भोकरदन तालुक्यातील चोऱ्हाळा येथील ग्रामपंचायत रोजगार सेवकाचा खून

शनिवारी रात्री तो काही मित्रांसोबत गावाच्या परिसरातील एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी गेला होता.

दीपक सोळंके

भोकरदन (जिल्हा जालना) : भोकरदन तालुक्यातील चोऱ्हाळा येथील ग्रामपंचायत रोजगार सेवकाचा (ता.११) शनिवारी रात्री खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. जीवन भावसिंग तोमर (वय ३१) असे खून झालेल्या रोजगार सेवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील चोऱ्हाळा येथील रहिवाशी असलेला जीवन तोमर हा तरुण चोऱ्हाळा येथील ग्रामपंचायतमध्ये रोजगार सेवकाचे काम करत होता. शनिवारी रात्री तो काही मित्रांसोबत गावाच्या परिसरातील एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी गेला होता. दरम्यान काही वेळाने येथून जवळ असलेल्या भोकरदन पारध मुख्य रस्त्यावरील जुई धरण पाटीजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.

शनिवारी मध्यरात्रीच ही माहिती भोकरदन पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठविला. दरम्यान हा खून कशामुळे करण्यात आला. याचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी भोकरदन पोलिसांकडून या प्रकरणी कसून चौकशी करण्यात येत आहे.

जिवन याने शनीवारी रात्री ज्या ठिकाणी जेवण केले त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात येत असल्याचे पोलिस उपनिरीक्षक विजय आहेर यांनी सांगितले. दरम्यान ऐन दिवाळीच्या सणाला घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT