crime esakal
मराठवाडा

Mumbai : रामनगरात जमिनीच्या वादातून एकाचा खून

मौजपुरी ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

भगवान भुतेकर

रामनगर : गायराण जमिनीच्या वादातून चुलत्याने पुतण्याचा जबर मारहाण करत खून केला. ही घटना जालना मंठा मार्गालगत रामनगर येथे शनिवारी (ता.15) रात्री घडली. मौजपुरी पोलिस ठाण्यात या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक राकेश नेटके यांनी दिली.

जालना तालुक्यातील सावरगाव हडप येथील संतोष ज्ञानदेव आढाव (वय ३३) आणि त्यांचे चुलते निवृत्ती आढाव यांच्यामध्ये रामनगर शिवारातील गायरान जमिनीचा वाद अनेक दिवसांपासून सुरू होता. या वादातूनच शनिवारी (ता.१५) रात्री संतोष आढाव यांच्यासह त्यांचा भाऊ संजय आढाव आणि सिद्धार्थ मगरे यांना चुलत्यासह पाच जणांनी लोखंडी रॉड,लाकडी दांडे आणि दगडाने जबर मारहाण केली.

या मारहाणीत संतोष आढाव यांचा गंभीर जखमी होत जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परतूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश बुधवंत, मौजपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश धोंडे, पोलिस उपनिरीक्षक राकेश नेटके यांनी पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळात भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

संशयित आरोपी निवृत्ती पाराजी आढाव यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमी संजय आढाव यांच्या तक्रारीवरून निवृत्ती आढाव, योगेश आढाव, वंदना आढाव, दीपक जाधव व अन्य एकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत संतोष आढाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT