jalna crime sakal
मराठवाडा

Jalna Crime : जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी हद्दपारीचे प्रस्ताव निकालाच्या प्रतीक्षेत

जालना : उपविभागीय अधिकाऱ्यांकडे १८, पोलिस अधीक्षकांकडे सहा तर जिल्हाधिकाऱ्यांकडे एमपीडीएअंतर्गत दोन प्रस्ताव

उमेश वाघमारे

जालना : शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून हद्दपारी आणि एमपीडीएअंतर्गत पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई केली जाते. त्यानंतर आजघडीला हद्दपारीचे २४ प्रस्ताव तर एमपीडीएअंतर्गत दोन प्रस्ताव निकालाच्या प्रतीक्षेत आहे.

गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून हद्दपारी, एमपीडीए, मोक्का आदींच्या कारवाया केल्या जातात. एकाच गुन्हेगारांकडून सतत गुन्हे केल्यानंतर त्याला जिल्ह्याच्या हद्दीतून बाहेर काढले जाते.

सध्या परिस्थितीमध्ये पोलिस प्रशासनाकडून कलम ५५ अंतर्गत पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे २९ संघटित गुन्हेगारांचे सहा प्रस्ताव निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. तर कलम ५६ आणि कलम ५७ अंतर्गत संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे १८ हद्दपारीचे प्रस्ताव निकालाधीन आहेत.

शिवाय जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडे एमपीडीएअंतर्गत दोन प्रस्तावांवर सुनावणी सुरू आहे. शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना पाहता या हद्दपारीसह एमपीडीए अंतर्गत दाखल झालेल्या प्रस्तावांवर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

शिवाय हद्दपारीसह मोक्का अंतर्गत नवीन प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश असल्याने पोलिस प्रशासनाकडून हे प्रस्ताव तयार करण्याची लगबग सुरू केली आहे. त्यामुळे जुन्या दाखल केलेले प्रस्ताव कधी निकाली निघणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात यापूर्वी कलम ५६ व ५७ अंतर्गत एकूण १८ हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविलेले आहेत. तर कलम ५५ अंतर्गत सहा प्रस्ताव दाखल केले असून एमपीडीए अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन प्रस्ताव दाखल केलेले आहे. शिवाय नवीन हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात सूचना प्राप्त झाल्या आहे.

— रामेश्‍वर खनाळ, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT