jalna crime youth killed over minor dispute 2 arrested by police Sakal
मराठवाडा

Jalna Crime : किरकोळ कारणावरून तरुणाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित ताब्यात, जालन्यातील घटना

Jalna Crime News : प्रकरणात मृताचे वडील सय्यद रहीम यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलिसांनी दोन संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सकाळ वृत्तसेवा

जालना : जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या पंचमुखी नगर परिसरात तरुणाचा गुरूवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून खून करण्यात आला. सैय्यद नदीम सैय्यद रहीम (रा.सुंदरनगर) असे मृताचे नाव आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर चाकूने भोसकून हा खून करण्यात आला.

मारेकऱ्यांनी धारदार हत्याराने मृताचा गळा चिरला तसेच छातीवर-पोटावर सपासप वार करून डोक्‍यावरही दुखापत केली. माहिती मिळताच चंदनझीरा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचारीऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, तातडीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.

या खून प्रकरणात मृताचे वडील सय्यद रहीम यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलिसांनी दोन संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन्हीही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. रवी शिवनाथ गवारे आणि विठ्ठल उर्फ माऊली बालासाहेब बोंबले (दोघेही रा.चंदनझीरा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत.

दरम्यान, आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करीत तसेच मुख्य आणि इतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी चंदनझीरा पोलिस ठाण्यात दोन तास ठिय्या मांडला होता. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत घालून इतर आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT