Jalna District Central Co-operative Bank esakal
मराठवाडा

Jalna : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात दिग्गजांनी दंड थोपटले

काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, भाजपकडून आमदार संतोष दानवे, आमदार बबनराव लोणीकर

सकाळ वृत्तसेवा

जालना : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात दिग्गजांनी दंड थोपटले आहेत. या निवडणुकीत रिंगणात आमदारांसह माजी आमदारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक अटळ असेल की बिनविरोध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली. यात संचालकांच्या १७ जागांसाठी ही निवडणूक होत आहेत. या निवडणुकीत एकूण ६९८ मतदार मतदार आहेत. शुक्रवारी (ता.२३) जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत. यात काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, भाजपकडून आमदार संतोष दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे यांच्या पत्नी शीतल कुचे, शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश टोपे, माजी आमदार अरविंद चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार शिवाजी चोथे आदी दिग्गजांचा समावेश आहे.

एकूण ७५ उमेदवारी अर्ज

निवडणुकीसाठी काही उमेदवारांनी विविध मतदार संघातून एकपेक्षा अनेक अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे १७ जागांसाठी एकूण ६७ उमेदवारांनी ७५ अर्ज दाखल झाले असून यात एका उमेदवाराने दोन ते चार अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची ता. २६ जून रोजी अर्ज छाननी होणार असून २७ जून रोजी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची तारीख आहे. तर ता.१२ जुलै रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर जिल्हा बँकेची निवडणूक होणार की बिनविरोध होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे.

एका मतदारसंघात एकमेव अर्ज

प्राथमिक पतपुरवठा, सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था तसेच धान्य अधिकोष सहकारी संस्था भोकरदन मतदार संघातून संतोष दानवे यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT