boys did not get girl for marrage 
मराठवाडा

'लग्नासाठी पोरगीच मिळत नाय!' लग्न करू पाहणाऱ्या मुलांची व्यथा

कैलास दांडगे

पारध (जालना): यंदा कर्तव्य आहे असे म्हणत, दिवाळी गेली, आता उन्हाळा सुरू आहे. परंतु गेल्या वर्षांपासून कोविड मुळे लग्न सोहळ्यांना ग्रहण लागले असून, प्रत्येक वडील आपल्या मुलींसाठी नोकरदार जावई शोधत असल्यामुळे दिवसेंदिवस उपवर मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षभरात अनेकांच्या कोविडमुळे नोकऱ्या गेल्या, ग्रामीण भागात अल्पभूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. तर काही मुलांनी शिक्षण घेऊन लहान-मोठे व्यवसाय सुरू केलेले आहेत. परंतु मुलगी पाहण्यासाठी गेल्यास मुलगा काय करतो ..? सरकारी नोकरी आहे काय, पगार किती आहे, जमीन किती आहे, मुलगा निर्वेशनी आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असल्यामुळे मुलांची लग्न जुळविण्यात अनेक अडचणी निर्माण होत असून, यामुळे मुलांचे वय वाढत असल्याचे ग्रामीण भागात चित्र आहे.लग्न होत नसल्यामुळे अनेक तरुण व्यसनाधीन ,गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहे. तर काहींना मानसिक आजार जडत आहे.

मुलींची संख्या कमी असल्यामुळे लग्नाला अडचण-
प्रत्येक समाजात दिवसेदिवस मुलींची संख्या घटत असल्यामुळे आणी मुलींच्या अपेक्षा वाढल्यामुळे मुलींना नवरा हा नोकरदार, आईवडीलांना एकुलता एक, शहरात राहणारा या गोष्टींना प्राधान्य दिले जात असल्यामुळे लग्नासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहे.अनेक तरुण स्पर्धा परीक्षा तयारी, व्यवसाय करीत आहे .परंतु तरुणांचे वय वाढत असल्यामुळे घरून लग्नासाठी तगादा लावला जात आहे पण सरकारी नोकरी नसल्यामुळे त्यांचे लग्न ठरण्यास अडचण येत आहे.

लग्नाचा सर्व खर्च करतो पण मुलगी द्या-
मुलगी पाहण्यासाठी गेल्यास पसंती झाल्यास अनेक रूढी-परंपरा याला फाटा देऊन लग्नाचा संपूर्ण खर्च मुलाकडील मंडळी करण्यास तयार होतात.परंतु तरीही मुलींकडील लग्नासाठी तयार होत नसल्यामुळे ग्रामीण भागात उपवर नवरदेवाची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.तर दुसरीकडे मुले मुलीकडून काहींच नको, मुलगी फक्त समजूतदार, कुटुंबाला सांभाळनारी गरीब कुटुंबातील असली पाहिजे असा अपेक्षा ठेवत आहे.दरम्यान, ग्रामीण भागात उपवर मुलांच्या लग्नाचा विषय मोठा बिकट होत असल्याचे चित्र आहे.

प्रत्येक मुलींनी नोकरदारच नवरा असला पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नाही. समाजात उत्कृष्टपणे शेती करणारे, व्यवसाय, जोडधंदे, खाजगी नोकरी करणारे ही तरुण आहेत. त्यामुळे आपली मानसिकता बदलणे काळाची गरज आहे.
-बंकिमचंद्र लोखंडे (ग्रामस्थ पारध) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT