Abdul Sattar Esakal
मराठवाडा

Abdul Sattar : काँग्रेस उमेदवाराला मदत केल्याची कबुली! अब्दुल सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची भाजपची मागणी; जालन्यात नेमकं काय घडतंय?

राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीत रावसाहेब दानवेंऐवजी कल्याण काळेंचा प्रचार केल्याचं एकप्रकारे कबुल केलं होतं. कल्याण काळे यांनी नुकतीच सत्तारांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली. तेव्हा सत्तारांनी काळेंचा डोक्यावर हात ठेवत ते चांगले मित्र आहेत आणि निवडणुकीत मदत केल्याची कबुली सत्तारांनी दिली.

संतोष कानडे

Jalna Lok sabha election 2024 : जालना लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांनी यांनी तब्बल १ लाख ९ हजार मतांनी दानवेंना पराभूत केलं. मात्र या मतदारसंघात महायुतीतील नेत्यांनी दानवेंचं काम केलं नसल्याची कुणकुण होत आहे.

राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीत रावसाहेब दानवेंऐवजी कल्याण काळेंचा प्रचार केल्याचं एकप्रकारे कबुल केलं होतं. कल्याण काळे यांनी नुकतीच सत्तारांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली. तेव्हा सत्तारांनी काळेंचा डोक्यावर हात ठेवत ते चांगले मित्र आहेत आणि निवडणुकीत मदत केल्याची कबुली सत्तारांनी दिली.

त्यामुळेच मागच्या काही दिवसांपासून भाजपने आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येतंय. आता भाजपचे सिल्लोड शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

दुसरीकडे रावसाहेब दानवे यांनीही शिवसेनेच्या नेत्यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचे संकेत देत नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने एक आंदोलन करुन सत्तांरांच्या गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, अब्दुल सत्तार हे महायुतीमध्ये नाराज असल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेशी आपला प्रासंगिक करार असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. ''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आपल्यावर विश्वास आहे तोपर्यंत आपला शिवसेनेशी प्रासंगिक करार कायम आहे.'' असं सांगत सत्तार यांनी सूचक इशारा दिला होता. मराठवाड्यातल्या आठ पैकी सात जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. केवळ एका जागेवर शिवसेना उमेदवार संदीपान भूमरे यांचा विजय झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : अजित आगरकरची दादागिरी आता बस झाली... रवी शास्त्री बनणार निवड समितीचे अध्यक्ष? X पोस्ट व्हायरल

Shashikant Shinde: महायुती सरकारवर जनतेचा रोष: प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; सरकारकडून मदतीच्या नावाखाली तोंडाला पाने पुसण्याचे काम

Nutritious Diwali Meal: दिवाळीत जेवणाचे ताट सजवा रंगीबेरंगी पोषक पदार्थांनी – आहार तज्ज्ञांचा सल्ला, स्वाद आणि आनंद कायम ठेवा!

Hingoli Ashram School Incident : आश्रमशाळेच्या वसतिगृहात अनुचित प्रकार; विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणी मुख्याध्यापकासह दोन शिक्षक निलंबित

MP SET Exam 2025: एमपी सेट 2025 परीक्षेची अधिसूचना जाहीर, जाणून अर्ज कधीपासून सूरू होणार

SCROLL FOR NEXT