jalna lok sabha mahayuti raosaheb danave  Sakal
मराठवाडा

Jalna News : रावसाहेब दानवेंचा फुलंब्रीत कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा; डॉ. कल्याण काळेची दानवेनी घेतला धास्ती..!

काँग्रेसचे कल्याण काळे विरुद्ध रावसाहेब दानवे अशी लढत होणार असल्याचे राजकीय जाणकार व्यक्त करीत असल्याने रावसाहेब दानवे यांनी डॉक्टर कल्याण काळेची धास्ती घेऊन मतदार संघात कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा सुरू केल्याची चर्चा सुरू आहे.

नवनाथ इधाटे

फुलंब्री : जालना लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून रावसाहेब दानवे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. फुलंब्री तालुक्यात आतापर्यंत बाबरा, वडोद बाजार, गणोरी, आणि फुलंब्री अशा चार वेगवेगळ्या ठिकाणी परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बोलून बैठका घेत बुथ मजबूत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

काँग्रेसचे कल्याण काळे विरुद्ध रावसाहेब दानवे अशी लढत होणार असल्याचे राजकीय जाणकार व्यक्त करीत असल्याने रावसाहेब दानवे यांनी डॉक्टर कल्याण काळेची धास्ती घेऊन मतदार संघात कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा सुरू केल्याची चर्चा सुरू आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा झाली नसली तरीही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांनी मतदार संघातील दौरे वाढवले आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीवर सर्वच उमेदवार आता भर देत असून नाते संबंध जोपासण्याचे काम करू लागले आहेत.

जालना लोकसभा मतदारसंघात फुलंब्री विधानसभा मतदारसंघात असल्याने संपूर्ण मतदारसंघात रावसाहेब दानवे विरुद्ध डॉक्टर कल्याण काळे असा सामना होण्याची चर्चा राजकीय जाणकार व्यक्त करू लागले आहे. महाविकास आघाडी कडून अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहे.

रावसाहेब दानवे विरुद्ध डॉ.कल्याण काळे हे कट्टर राजकीय विरोधक असल्याचे जग जाहीर आहे. काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे यांच्या नावावर शिक्का मुहूर्तब होण्याच्या अगोदरच त्यांनी बैठकांचा सपाटा सुरू केला आहे.

याची धास्ती येऊन खासदार रावसाहेब दानवे हे बुथ कमिटी, शक्ती प्रमुखाच्या तालुक्यात बैठका सुरू केल्या आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे विरुद्ध डॉ.कल्याण काळे यांच्यात लढत होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहे. या कार्यकर्त्याच्या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ, बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण, तालुकाध्यक्ष सांडू जाधव, यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये 2009 मध्ये रावसाहेब दानवे विरुद्ध डॉ.कल्याण काळे यांच्यात काट्याची लढत झाली होती. केवळ आठ हजार मताने कल्याण काळे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. पुन्हा हाच सामना 2024 मध्ये दिसून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सलग पाच वेळा खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध काँग्रेसकडून डॉ.कल्याण काळे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: पर्यटकांचा हिरमोड! देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हाणी घाट बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

Pune Property Tax : पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली: पहिल्या तिमाहीत १३९५ कोटी, गेल्या वर्षीपेक्षा १०२ कोटींची वाढ

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

SCROLL FOR NEXT