english words in local 
मराठवाडा

Corona Impact: कोरोनाकाळात ग्रामीण भागात वाढला इंग्रजी शब्दांचा वापर

प्रदीप तळणीकर

तळणी (जालना): कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली. मागील एक वर्षांपासून कोरोनाचा प्रभाव देशासह राज्यात आहे. आता कोरोनाचा पुन्हा प्रभाव जाणवत आहे. पण याकाळातर ग्रामीण भागात ग्रामस्थांच्या भाषेत बऱ्याच इंग्रजी शब्दांनी स्थान मिळवलं आहे. सर्व सामान्य ग्रामस्थ हा सराईतपणे इंग्रजी भाषेतील काही शब्दांचा वापर करू लागला आहे. जे शिक्षित आहेत त्यांच्या तोंडून इंग्रजी शब्द निघाला तर नवल नाही. परंतु अडाणी, अर्ध शिक्षित किंवा मध्येच शाळा सोडलेले, लिहीता वाचता न येणारे ग्रामस्थ सर्रास इंग्रजी भाषेचा वापर करु लागले आहेत.

कोरोनामुळे नवीन इंग्रजी शब्दांची भर-
ग्रामीण भागात लोकांच्या तोंडून असंख्य इंग्रजी शब्द बाहेर पडत आहेत . जसे लॉकडाऊन, मिनी लॉकडाऊन, हॅण्ड वॉश, सॅनिटायझर, मास्क, कर्फ्यु, क्वारंटाईन, होम क्वारंटाईन, इन्स्टीट्युशनल आईसोलेशन, नर्स, वार्ड बॉय, कंपाऊडर, सोशल डिस्टन्स ट्रॅव्हल हिस्ट्री इम्युनिटी हिस्ट्री, कोरोना पेशंट, आरटीपीसीआर टेस्ट, हॉटस्पॉट सेंटर, एरिया सील, हाय सेन्सिटिव्ह एरिया, कोरोना व्हॅक्सीन असे विवीध इंग्रजी शब्द ग्रामीण भागात ही ऐकायला भेटत आहेत.

ग्रामीण भागात वाढ- 
तसेच फोन लावताना देखील सुरवातीची सुचनाही इंग्रजीतून येते ती पूर्ण होईपर्यत मोबाईल धारक वाट पाहत आहे. नेहमी बोली भाषेत , गावरान भाषेत बोलणारा सर्व सामान्य माणूस मात्र इंग्रजी शब्द वापरत आहे. अनेक अवघड इंग्रजी शब्द सफाईदारपणे बोलताना दिसत आहे. कोरोना संबधी बोलताना शेतमजुर, शेतकरी, रोजदारीवर काम करणाऱ्या महिला असे अनेक जण इंग्रजी शब्द वापरत आहेत. विशेष म्हणजे नेहमी मराठीतून बोलणाऱ्या ग्रामस्थांनी याबाबत कोठेही प्रशिक्षण, शिकवणी लावली नाही. वारंवार बोलून हे शब्द अंगवळणी पडले आहेत . 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyotiba Temple Incident : जोतिबा डोंगरावर हायव्होल्टेज ड्रामा! बिगर सासनकाठी घेऊन आलेल्या मद्यधुंद तरुणांनी थेट पुजाऱ्यांवरच उगारला हात; पहा व्हिडिओ

Pune Accident: पुण्यातील तिघांचा अपघातात मृत्यू; एकजण गंभीर, पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ भीषण धडक, काय घडलं!

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिवनिका संस्थानमधील ट्रस्टींचीही तपासणी होणार

महाकुंभामध्ये व्हायरल झालेली मोनालिसा भोसलेला जीवे मारण्याच्या धमक्या; व्हिडिओ शेअर करत मदतीची विनंती

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

SCROLL FOR NEXT