jalna  sakal
मराठवाडा

Jalna News : विद्यार्थ्यांनी बनविल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती

अंबड शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

अंबड - गणेशोत्सवानिमित्त अंबड शहरासह तालुक्यातील विविध गावात विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. यास प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी शाडू मातीच्या मूर्ती बनविल्या. अनेकांनी घरी या मूर्तीची स्थापना केली.

पर्यावरणप्रेमी, कलाशिक्षक, मूर्तिकार, सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेतलेला आहे. दरम्यान, किनगाववाडी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक रवींद्र जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेत कार्यशाळा घेण्यात आली.

यात गजानन जाधव,चंद्रकांत गायकवाड, सदाशिव चोले, अजय खनके, सुवर्णमाला मुंडे, संगीता पोले या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी माती, शाडू माती, बिया संकलित करून गणेश मूर्ती बनविल्या. अंबड शहरातील आर.पी.इंग्लिश स्कूल येथे कलाशिक्षक नरेंद्र माटोले यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याबाबत प्रशिक्षण दिले. गोलापांगरीच्या नेहरू विद्यालयातही हा उपक्रम घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

२४ तासात आरोपी ताब्यात! बाहेरच्या टॅक्सी चालकाला लोणावळ्यात मारहाण; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Kolhapur news: मुदाळतिट्टा चौकात वाहतूक कोंडीचा महापूर! वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि प्रवाशांचा त्रास शिगेला

Shrikant Shinde: शिवसेनेला शक्ती प्रदर्शनाची गरज नाही, अंबरनाथमध्ये भगवा ठाम; श्रीकांत शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

शुभमन गिलचं साराशी लग्न कधी? चाहत्याने थेट वडिलांनाच विचारला प्रश्न, Video तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT