jalna  sakal
मराठवाडा

Jalna News : गाडी पंक्चर झाल्याने बकऱ्या चोरांचा डाव फसला

स्वतःची गाडी पेटवून देत काढला पळ ; एकाला पकडले दोन पसार

दीपक सोळंके

भोकरदन - हसनाबाद रस्त्यावरील निमगाव गावाजवळ बकऱ्या चोरून नेत असतांना चोरट्यांची गाडी अचानक रस्त्यात पंक्चर झाली. अन चोरट्यांचा डाव फसला. त्यातच या चोरांना गावकऱ्यांनी हटकल्यामुळे घाबरलेल्या चोरट्यांनी स्वतःची गाडी पेटवून देत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही गावकरी व शेतकऱ्यांनी एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दोघे मात्र, पळून जाण्यात यशस्वी ठरले. आता पोलिस त्यांचा शोध घेत आहे. हा प्रकार रविवारी (ता.24) सकाळी आठ वाजेदरम्यान घडला.

भोकरदन तालुक्यात मागील काही महिन्यांपासून बकऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बकऱ्या चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने शेतकरी व पशुपालक त्रस्त झाले आहे. रविवारी सकाळी तालुक्यातील हसनाबादकडून तीन बकऱ्या चोर पाच ते सहा बकऱ्या चोरून त्या स्विफ्ट गाडीत कोंबून भोकरदनकडे निघाले असता रस्त्यात निमगाव गावाजवळ त्यांची गाडी अचानक पंक्चर झाली.

त्यामुळे या चोरट्यांनी बकऱ्या गाडीतून बाहेर काढल्या. यादरम्यान या चोरट्यांना परिसरातील काही शेतकरी व ग्रामस्थांनी हटकले असता या चोरट्यांनी उडवा उडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. त्यामुळे गावकऱ्यांचा संशय बळावला गावकऱ्यांनी याची माहिती भोकरदन पोलिसांनी दिली.

त्यामुळे चोरटे हे चांगलेच घाबरले व त्यांनी सोबतची स्वतःची गाडी पेटवून देत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावकऱ्यांनी पाठलाग करून एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले तर दोघेजण हातातून निसटून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पोलिसांनी बकऱ्या व एका चोरट्याला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी केली जात तसेच फरार झालेल्या दोन चोरट्यांचा देखील शोध घेतला जात असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, यांना पदावर ठेऊ नका'', धनंजय देशमुखांची अजित पवारांना विनवणी

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Latest Marathi News Live Updates: अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, पुलावरुन पाणी

SCROLL FOR NEXT