balasaheb anbedkar  sakal
मराठवाडा

Jalna News - अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे -प्रकाश आंबेडकर

देशात ,राज्यात आज दडपशाही सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

दिलीप दखणे

वडीगोद्री - केंद्रात मराठा आरक्षण बाबत खासदार उदासिन दिसतात. येणार्या अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण साठी सुरु असलेल्या उपोषणास वंचित बहुजन आघाडी चे प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (ता. 5) रोजी भेट देऊन मनोज जरांगे यांच्या सोबत चर्चा केली.

यावेळी श्री. आंबेडकर म्हणाले, की आरक्षण बाबत बाबासाहेब आंबेडकर यांनी भुमीका मांडली होती. त्यासाठी यादी सादर केली होती. शिक्षण क्षेत्रात मराठा समाजाला आरक्षण गरजेचे आहे. वंचित समुहाची सुची करूण इतरांच्या बरोबर आरक्षण आनावे असा आग्रह बाबासाहेब आंबेडकर यांचा होता. बी.पी.मंडळ अयोगात काहीना न्याय मिळाला तर काहीना न्याय मिळाला नाही.

देशातील नागरीक या देशाचे मालक आहेत. खासदार, आमदार नाही असे श्री. आंबेडकर यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करीता केंद्राला व राज्य शासनाला न्यायलयात भांडावे लागेल. त्यासाठी शासनाने बाजु मांडावी असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

देशात ,राज्यात आज दडपशाही सुरू झाली आहे. या ठिकाणी जो हल्ला झाला त्याचा निषेध करतो, जनता दडपशाही खपवुन घेणार नाही, असे ही ते म्हणाले.दरम्यान आज आठव्या दिवशी आपले उपोषण सुरू असुन मार्ग निघाला नाही तर या पुढेही उपोषण सुरुच राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर जैन बोर्डिंगचा जमीन खरेदी व्यवहार रद्द, गोखले बिल्डर्सचा मोठा निर्णय

Female Doctor Case: हे तर गलिच्छ राजकारण, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रणजितसिंह यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच सांगितलं..

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर, काय आहे कारण?

'शर्टमध्ये हात घालत त्याने किस केलं...' अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाली...'वडिलांच्या वयाच्या दिग्दर्शकाने...'

Highway Traffic: संपली सुटी; महामार्गावर प्रवाशांची गर्दी; कोल्हापूर नाका, मलकापुरात वाहनचालक वैतागले..

SCROLL FOR NEXT