jalna  sakal
मराठवाडा

Jalna News : पावसाळा ‘कोरडा’ दुष्काळसदृश स्थिती जिल्ह्यात २८ ते ५३ दिवस पावसाविना

जिल्ह्यात यंदा जून महिन्यापासूनच पावसाने हुलकावणी दिली.

उमेश वाघमारे

जालना - पावसाळ्याचा साडेतीन महिन्यांचा कालावधी संपला आहे. मात्र, जिल्ह्यात आठ ही तालुक्यात या साडेतीन महिन्यांपैकी एक महिन्यांपेक्षा अधिक काळ कोरडे गेले आहेत. विशेष म्हणजे परतूर आणि बदनापूर तालुक्यात ५० पेक्षा अधिक दिवस पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे यंदा दुष्काळात जिल्ह्यात येऊन ठेपल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये

जिल्ह्यात यंदा जून महिन्यापासूनच पावसाने हुलकावणी दिली. जुलै महिन्यात पावसाच्या रिमझिमीवर जिल्ह्यातील पेरण्या उरकल्या. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात झालेल्या हलक्या पावसाच्या रिपरिपीवर खरीप पिकांनी तग धरला. मात्र, उत्पादनात मोठी घट होण्याची चिन्हे आहेत.

मागील साडेतीन महिन्यात जिल्ह्यात ५५५.८३ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ३८१.५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे तब्बल १७४.३३ मिलिमीटर पावसाची तूट आहेत.विशेष म्हणजे जिल्ह्यातील आठ तालुक्यात पावसाळ्याचे २८ ते ५३ दिवस कोरडे गेले आहेत. त्यामुळे यंदा दुष्काळ जिल्ह्यात येऊन ठेपल्याचे विदारक चित्र पाहण्यास मिळत आहेत.

परतीच्या पावसाचा मेळ लागेना जिल्ह्यात परतीचा पाऊस जोरदार बरसले अशी अपेक्षा होता. मात्र, सध्या तरी तसेच चित्र दिसून येत नाही. जर परतीचा पाऊस झाला नाही, तर जिल्ह्यात यंदा भयावह दुष्काळाला तोंड देण्याची वेळ येणार आहे.२.५ मिलिमीटर पाऊस आधारित पावसाचे कोरडे दिवस(आकडेवारी नैसर्गिक आपत्ती विभाग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT