jalna Sakal
मराठवाडा

Jalna News : जालनेकरांनी थकवला ११२ कोटींचा कर ; मालमत्ता जप्तीच्या प्रशासन तयारीत, थकबाकीदारांच्या याद्या बनविणे सुरू

जालना शहराचा विस्तार झाल्याने घरांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे महापालिकेच्या कराच्या स्वरूपात येणाऱ्या रकमेतही वाढ होणार आहे. मात्र, आज घडीला जालनेकरांकडे तब्बल ११२ कोटींचा कर थकीत आहे.

सकाळ वृत्तसेवा

जालना : जालना शहराचा विस्तार झाल्याने घरांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे महापालिकेच्या कराच्या स्वरूपात येणाऱ्या रकमेतही वाढ होणार आहे. मात्र, आज घडीला जालनेकरांकडे तब्बल ११२ कोटींचा कर थकीत आहे. यात ८१ कोटी ८८ लाखांचा कर मागील अनेक वर्षांचा थकीत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आता मालमत्ता जप्तीच्या तयारीला लागली आहे.

जालना शहराचा होणारा विस्तार लक्षात घेता राज्य शासनाकडून येथे महापालिकेची स्थापन केली गेली. महापालिका झाल्यानंतर शहरातील नागरी सुविधांमध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. महापालिकेच्या तिजोरी नळपट्टी, घर पट्टीच्या करातून मोठी रक्कम येते. मात्र, पालिका झाल्यापासून वर्षानुवर्ष कोट्यवधींचा कर थकीत असल्याने महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे.

त्यामुळे यंदाच्या मार्च अखेरपर्यंत महापालिकेका कर वसुलीवर अधिक लक्ष देण्याची तयारीत आहे. कारण यंदा महापालिकेला चालू वर्षातील ३० कोटी ६३ लाख ६१ हजारांचा कर वसुल करायचा आहेत. तर मागील थकीत तब्बल ८१ कोटी ८८ लाख ३५ हजार आहे. एकूण ११२ कोटी ५१ लाख ९६ हजारांचा कर वसुल करण्याचे महापालिकेसमोर आव्हान आहे. त्यामुळे महापालिकेकडून आज घडीला कर वसुलीसाठी २२ अधिकारी, कर्मचारी नेमण्यात आले असून कर वसुली सुरू केली आहे.

ता.३१ डिसेंबरपर्यंत पाच कोटी ५४ लाख ९६ हजारांचा कर महापालिकेकडून वसूल करण्यात आला आहे. कर वसुलीची रक्कम अधिक असल्याने महापालिकेने वर्षानुवर्ष कर थकवणाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे यंदा जालनेकरांनी कर न भरल्यास महापालिकेच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तर डिसेंबर २०२३ अखेर महापालिकेने पाच कोटी ५४ लाख ९६ हजारांची कर वसुली केली आहे. जानेवारी महिन्यात करण्यात आलेल्या कर वसुलीची लेखा-जोखा महिना अखेरीस केला जाणार आहे, असे सांगण्यात आले.

महापालिकेने कर वसुली मोहीम सुरू केली आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात कराची रक्कम थकीत आहे, अशा करधारकांच्या याद्या काढण्याचे काम सुरू केले आहे. जर या करधारकांनी कर भरला नाही तर त्यांच्या मालमत्ता महापालिकेकडून जप्त केल्या जातील.

— संतोष खांडेकर,

आयुक्त, शहर महापालिका, जालना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Wildlife: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! अंबा नदीत आढळला परदेशी व दुर्मिळ 'अल्बिनो एलीगेटर गार' मासा; रायगडमध्ये दुर्मिळ परदेशी माशाचा शोध

सई ताम्हणकरच्या 'बोल बोल राणी' मधलं 'सुपरनोव्हा' गाणं प्रदर्शित; पण सुपरनोव्हा म्हणजे काय?

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार! पत्नीशी वादानंतर पतीने घर पेटवले; तीन पाळीव मांजरांचा मृत्यू

Kinwat Forest Department: किनवट वन विभागाला हायकोर्टाचा झटका; RTI माहिती न दिल्याप्रकरणी अधिकाऱ्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT