jalna sakal
मराठवाडा

Jalna : मंठ्यात नवरात्रोत्सवाचे लागले वेध

श्री रेणुकामाता मंदिरात जय्यत तयारी सुरू

कृष्णा भावसार

मंठा : तालुक्यासह इतर अनेक ठिकाणच्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका देवी माता मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सध्या विविध व्यावसायिक शहरात दाखल होत असल्याने नवरात्रोत्सवाचे वेध लागल्याचे चित्र आहे.

मागील दोन वर्षे कोरोनामुळे नवरात्रोत्सवाची यात्रा रद्द झाली होती. यावर्षी नवरात्र महोत्सव निर्बंधमुक्त होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यासह ठिकठिकाणाहून येथे भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापन, नगरपंचायत व पोलिस प्रशासन नियोजन करीत आहे.

मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली आहे. शिवाय येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता आदी कामे करण्यात आलेली आहेत. सध्या नवरात्र महोत्सवात व्यवसायाकरिता योग्य जागा मिळावी याकरिता सध्या रहाट पाळणे व इतर छोटे व्यावसायिक सहकुटुंब दाखल झाले आहे. काही व्यावसायिक जागा निश्चित करून दुकानाचे साहित्य व माल आणण्याची तयारी करीत आहेत.

यावर्षी चांगले उत्पन्न मिळेल अशी पानफुले, प्रसाद, खेळणी विक्रेते, आकाशपाळणे चालक व इतर छोटे व्यावसायीक अपेक्षा बाळगून आहेत.

नवरात्र महोत्सव काळात भाविकांची मोठी गर्दी राहणार आहे. त्या दृष्टीने मंदिर परिसरात स्वच्छता राहील याकरिता सफाई कर्मचारी व दोन घंटागाड्या तसेच अग्निशमन बंब तैनात करण्यात येणार आहे. मंठा शहर ते मंदिरापर्यंत पथदिवे तसेच मंदिरात परिसरात हायमास्ट दिवे बसविले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांचा भाविकांना त्रास होऊ नये याकरिता दुरुस्तीची कामे केली जात आहे.

- रितेश बैरागी , नगरपंचायत मुख्याधिकारी, मंठा

नवरात्र महोत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता महिला व पुरुषांच्या वेगळ्या रांगांचे नियोजन राहील. मंदिर व परिसरात प्रकाश व्यवस्था तसेच सीसीटीव्ही कॅमेरे याबाबत मंदिर प्रशासनास सूचना दिल्या आहेत. यावर्षी भाविकांची गर्दी जास्त राहणार त्या दृष्टीने महिला पोलिस व होमगार्ड यांची मागणी वरिष्ठाकडे केली आहे. नवरात्र महोत्सव शांततेत व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त राहणार आहे.

- संजय देशमुख, पोलिस निरीक्षक, मंठा.

मंदिर रंगरंगोटी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, परिसर स्वच्छता आदी कामे झाले आहेत. मंदिरावर विद्युत रोषणाई तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. वाहनतळ व इतर नियोजनाची कामे सुरू आहेत.

- राधाकिसन ठोके, पुजारी, मंठा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT