accident  sakal
मराठवाडा

Jalna : लेकीचं लग्न लावलं अन् बापावर काळाचा घाला; दोन्ही लेकरं झाली पोरकी

मुलीच्या लग्नासाठी आले होते गावी

सकाळ वृत्तसेवा

वडीगोद्री : धुळे-सोलापूर रस्त्यावर भालगाव पाटी जवळ बोलोरो पिकअप आणि दुचाकी अपघात झाला. यात वडीगोद्री (ता. अंबड) येथील रहिवासी असलेल्या एका सीमा सुरक्षारक्षक जवानाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. तीन) रात्री घडली.

वडीगोद्री येथील हनुमान यशवंता लिपणे (वय ४३) हे त्रिपुरा येथे सीमा सुरक्षा रक्षक जवान म्हणून कार्यरत होते. चार दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलीचे लग्न झाले. मुलीच्या लग्नासाठी ते सुटीवर गावी आले होते.

रविवारी सुटी संपत असल्याने मुलाच्या पुढील शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथे एका शाळेत शुल्क भरण्यासाठी दुचाकीने (एमएच २१ एजे ५७९९) ते गेले होते. वडीगोद्री गावी परत येत असताना मागून येणाऱ्या बोलोरो पिकअपने (एमएच ६ एजी ७५६९) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात लिपने जागीच ठार झाले. घटनास्थळावरून पिकअप चालकाने वाहनासह पळ काढला. परंतु, परिसरातील ग्रामस्थांनी पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

वडिलांना कृतीशील श्रद्धांजली

आपल्या मुलाने खूप शिकावे, अशी इच्छा लिपणे यांची होती. त्यांच्या पत्नीचे निधन झालेले आहे.

आता वडिलांचेही निधन झाल्याने त्यांच्या मुला-मुलीवर दुःखाचे डोंगर कोसळला आहे. दरम्यान, त्यांचा मुलगा सुशांत हा दहावी परीक्षेचा पेपर देऊन वडिलांच्या अंत्यविधीला हजर झाला. त्याने वडिलांना कृतिशील श्रद्धांजली अर्पण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray CJP protest : आदित्य ठाकरे निवडणूक आयुक्तांना थेट गद्दार म्हणाले, ‘गद्दार ज्ञानेश गेलेच पाहिजेत’; CJPच्या आंदोलनाला पाठिंबा

Pune News : पुणे महापालिकेचा कारभार 'रामभरोसे'; प्रमुख अधिकारी, पदाधिकारी परदेशात

Cockpit attack: 'मोठी किंमत मोजावी लागेल', कॉकपिट घटनेवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा इशारा

Alandi News : 36 विद्यार्थी सुखरूप आळंदीत परतले; पोलीस ठाण्यात पालकांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

SCROLL FOR NEXT