Death Sakal
मराठवाडा

नोकरीला हजर होण्याआधी झाला बेपत्ता; इंजिनिअर तरुणाचा आढळला मृतदेह

अभिषेक 26 फेब्रुवारीला रात्री 10 वाजेला एका हॉटेल मध्ये जेवण करून राहत असलेल्या वसतिगृहात परतणार होता.

दीपक सोळंके

भोकरदन (जिल्हा जालना) : तालुक्यातील तांदुळवाडी (कोठी) येथील रहिवाशी असलेल्या अभिषेक कैलास खरात (22) या तरुणाचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले होते.

महाविद्यालयाच्या कॅपस मध्ये त्याचे सलेक्शन झाल्याने तो (ता.28) फेब्रुवारीला नोकरीच्या ठिकाणी हजर होणार होता. मात्र, (ता.26) फेब्रुवारी पासून तो अचानक बेपत्ता झाला. व पाच दिवसांनी बुधवारी (ता.दोन) मार्चला त्याचा मृतदेह नाशिक येथील एका कॅनॉल मध्ये आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

भोकरदन तालुक्यातील तांदुळवाडी येथील कैलास खरात यांचा अभिषेक खरात हा एकुलता एक मुलगा नाशिक येथील के के वाघ इंजिनिरिंग महाविद्यालयात सॉफ्टवेअर इंजिरिंगचे शिक्षण घेत होता. त्याचे शिक्षण पूर्ण होवून एका कंपनीत सलेक्शन झाले होते. त्याने तसे आई वडील व नातेवाईकांना सांगितले होते. अभिषेक 26 फेब्रुवारीला रात्री 10 वाजेला एका हॉटेल मध्ये जेवण करून राहत असलेल्या वसतिगृहात परतणार होता. मात्र, तो वसतिगृहात परतला नाही. त्यामुळे त्याच्या मित्रांनी (ता.27) रोजी आईवडील यांना याबाबत कळविले.

आई,वडील काका व इतर नातेवाईकांनी नाशिक गाठून त्याचा शोध सुरू केला मात्र, त्याचा शोध लागत नव्हता त्यामुळे त्यांनी आडगाव पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. बुधवारी (ता.दोन) त्याचा मृत्यूदेह दुपारी 1 वाजेच्या सुमारास नाशिकच्या सय्यद पिंप्री परिसरातील कॅनाल मध्ये आढळून आला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मृत्यूची बातमी कानावर येताच फोडला हंबरडा..

कैलास खरात यांना दोन मुली व अभिषेक हा एकुलता एक मुलगा होता, तो ज्या दिवसापासून बेपत्ता झाला तेंव्हापासून त्याच्या आईने अन्नबंद केले होते. आज त्याच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कानावर पडली तेव्हा सर्वांनी हंबरडा फोडला. त्याच्यावर बुधवारी (ता.दोन) रात्री उशिरा तांदुळवाडी या राहत्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

आठ दिवसांनी येणार होता बहिणीच्या लग्नाला

मितभाषी व अत्यंत हुशार असलेला अभिषेक 28 तारखेला नोकरीच्या ठिकाणी हजर होवून आठ दिवसांनी तांदुळवाडी येथे (ता.नऊ) मार्चला चुलत बहिणीच्या लग्नाला येणार होता. मात्र, त्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT