Jalna trader beating robbery obstructing case with gun esakal
मराठवाडा

जालना : पिस्तूल दाखवून व्यापाऱ्यास लुटले

दुचाकीसह तब्बल सहा लाख ९२ हजार रुपये लंपास

सकाळ वृत्तसेवा

जालना : शहरात गोल्डन ज्युबली शाळेच्या समोर एका व्यापाऱ्याला अडवून गावठी पिस्तुलाचा धाक दाखवत बेदम मारहाण करून लुटल्याचा प्रकार सोमवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडला आहे. अमित अग्रवाल असे या व्यापाऱ्याचे नाव असून तब्बल सहा लाख ९२ हजार रुपये लंपास झाल्याचे पोलिसांकडून प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

शहरातील नवीन मोंढा परिसातील तिरुपती ट्रेडर्सचे मालक अमित अग्रवाल सोमवारी रात्री दुकान बंद करून स्कुटीवर सहा लाख ९२ हजार रुपये घेऊन घरी निघाले होते. शहरातील गोल्डन ज्युबली शाळेसमोर आल्यानंतर सोमवारी रात्री पावणेआठ ते आठ वाजेच्या दरम्यान दुचाकीवरून आलेल्या तीन संशयितांनी त्यांना अडविले. त्यानंतर एका संशयिताने त्यांच्या पायावर लोखंडी गजाने मारहाण केली. शिवाय गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून स्कुटीसह डिकीतील सहा लाख ९२ हजारांची रोकड घेऊन तिघेही पसार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग , बाजार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर पायघन यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे दोन तर सदर बाजार पोलिस ठाण्याचे तीन असे पाच पथक शोधकार्यासाठी रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू होता. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.

वाटमारीच्या घटनांमध्ये पुन्हा होतीय वाढ

जालना-मंठा रोडवरील राममूर्ती शिवारात शुक्रवारी रात्री अभिजीत दुसाने या सराफा व्यापाऱ्याला गावठी पिस्तुलधारी तीन व्यक्तींनी डोळ्यात मिरचीची पावडर टाकून लुटले होते. यात सात तोळे सोने आणि ९० हजार रोख रक्कम लुटण्यात आली होती. हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी उघड करून चार संशयितांना पकडलेही होते. त्यानंतर अकरा दिवसांच्या अंतरावर पुन्हा व्यापाऱ्याला शहरातील भररस्त्यात लुटण्याचा प्रकार सोमवार घडला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT