sakal
मराठवाडा

जालना: लसीकरणाला बुस्टर; जिल्ह्यात ९ लाख ७० हजार जणांना डोस

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या मिशन कवच कुंडल अभियानामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला जिल्ह्यात बुस्टर मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

जालना : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या मिशन कवच कुंडल अभियानामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला जिल्ह्यात बुस्टर मिळत आहे. दरम्यान, आरोग्य विभागातर्फे शनिवारी (ता.१९) दिवसभरात २७ हजार २७३ जणांना लस टोचण्यात आली. जिल्ह्यात शनिवारपर्यंत एकूण ७ लाख १२ हजार १६४ जणांना पहिला तर २ लाख ५८ हजार ६२७ जणांना दुसरा डोस असे एकूण ९ लाख ७० हजार ७९१ इतके लसीकरण झाले आहे.

जिल्ह्यात आरोग्य विभागासह शिक्षण विभागही लसीकरणाबाबत जागृती करीत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाला प्रतिसाद वाढला आहे. दरम्यान, शनिवारी ठिकठिकाणी लसीकरण झाले. यात ३७ फ्रन्टलाइन वर्करला दुसरा डोस देण्यात आला. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील १२ हजार ६६२ जणांना पहिला डोस व ४ हजार ४७४ जणांना दुसरा डोस असे १७ हजार १३६ जणांचे लसीकरण झाले.

याशिवाय ४५ ते ६० वर्ष वयोगटातील ३ हजार ६४१ जणांना पहिला डोस व २ हजार २२ जणांना दुसरा डोस असे ५ हजार ६६३ जणांचे लसीकरण झाले. ६० वर्ष वयोगटावरील २ हजार ७७४ जणांना पहिला डोस व १ हजार ६६३ जणांना दुसरा डोस असे ४ हजार ४३७ जणांचे लसीकरण झाले. यात एकूण १९ हजार ७७ जणांना पहिला तर ८ हजार १९६ जणांना दुसरा असे एकूण २७ हजार २७३ जणांचे शनिवारी लसीकरण झाले आहे, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Health : अभिजीत दिपके यांची प्रकृती अचानक बिघडली; पत्रकारांशी संवादाआधीच उलटी, डॉक्टरांकडून घरी तपासणी

मंत्र्यांसमोरच ऑपरेटरने मागितली ५० हजाराची लाच, अनुसूचित जाती-जमाती कल्याण विभागातील धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update : भाजपा आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय घडामोडींना वेग

Mumbai High Court: दुसऱ्या पत्नीच्या मुलालाही अनुकंपा नोकरीचा अधिकार; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bhor Solar Machinery Vandalism: भोंगवली वादग्रस्त प्रकल्पावर रात्रीच्या वेळी जाळपोळ कामगारांना मारहाण

SCROLL FOR NEXT