jalna water storage only 1 64 mm rain forecast weather update water scarcity Sakal
मराठवाडा

Jalna Water Crisis : जालना जिल्ह्यात प्रकल्प कोरडेच; केवळ १.६४ मिलिमीटर उपयुक्त पाणीसाठा

परिणामी आज घडीला केवळ १.६४ मिलिमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदाही पाणी टंचाईचे संकट कायम राहते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

जालना : शहरासह जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी संपला आहे. मात्र, तरी देखील जिल्ह्यात मध्यम व लुघ प्रकल्प कोरडेच आहे. परिणामी आज घडीला केवळ १.६४ मिलिमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदाही पाणी टंचाईचे संकट कायम राहते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात सात मध्यम व ५७ लघू प्रकल्प आहेत. गतवर्षी अल्प पाऊस झाल्याने हे प्रकल्प कोरडे पडले होते. त्यामुळे गतवर्षी जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे २६४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

मात्र, पावसाळ्याचा दीड महिना संपला तरी सर्वदूर जोरदार पाऊस झालेला नाही. परिणामी मध्यम आणि लघू प्रकल्पांत पाण्याची आवक झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात आज घडीला केवळ १.६४ मिलिमीटर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. पुढील अडीच महिन्यांत पावसाचा जोर वाढ नाही, यामुळे यंदाही जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट कायम राहणार असल्याचे चित्र आहे.

प्रकल्पाचे नाव - उपयुक्त पाणीसाठा (टक्के)

कल्याण गिरजा -१८.३०

कल्याण मध्यम -००.००

अप्पर दुधना -००.००

जुई मध्यम -००.००

धामना मध्यम -००.००

जिवरेखा मध्यम- ००.००

गल्हाटी मध्यम- ००.००

एकूण -२.५८

१४ प्रकल्प कोरडे

पावसाअभावी १४ प्रकल्प कोरडे आहेत. यात एक मध्यम व १३ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. तर तब्बल ४३ प्रकल्पांची पाणी पातळी ही जोत्याखाली आहे. यामध्ये पाच मध्यम व ३८ लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

जिल्ह्यात ३०८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी देखील जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न कायम असून तब्बल पाच लाख १७ हजार १२५ ग्रामस्थ तहानलेले आहेत. त्यामुळे या ग्रामस्थांना जिल्हा प्रशासनाला अर्धा जुलै महिना सरला तरी ३०८ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

गतवर्षी जिल्ह्यातील पाच तालुक्यांत राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला होता. तर तीन तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केला होती. परिणामी ता.तीन जुलैपर्यंत टंचाई आराखडा तयार करण्यात आला होता.

मात्र, जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे. परिणामी पुन्हा जिल्ह्यात टॅंकर सुरू करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तब्बल १८५ गावांसह ५० वाड्यांमधील पाच लाख १७ हजार १२५ ग्रामस्थांना ३०८ टॅंकरव्दारे ६२० खेपांद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाचा जोर न वाढल्यास जिल्ह्यातील टॅंकरच्या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

भोकरदन शहरात ३५ टॅंकर

भोकरदन शहराला जुई मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. मात्र, जुई मध्यम प्रकल्प कोरडा आहे. त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे. परिणामी भोकरदन शहरातील ३२ हजार ६८० नागरिकांना ३५ टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT