Shiv Jayanti In London sakal
मराठवाडा

Shiv Jayanti In London : साहेबांच्या देशात घुमला शिवरायांचा जयजयकार! जालनेकरांची लंडनमध्ये शिव जयंती

रयतेचा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण जगात साजरी केली जाते. सोमवारी (ता. 19) लंडनमध्ये स्थित असलेल्या जालनेकरांनी लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

उमेश वाघमारे

जालना : रयतेचा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण जगात साजरी केली जाते. सोमवारी (ता. 19) लंडनमध्ये स्थित असलेल्या जालनेकरांनी लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी घनसावंगी तालुक्यातील लिंबी येथील धिरजसिंह तौर यांनी पुढाकार घेत भारतीयांना एकत्र आणून लंडनमध्ये शिव जयंती उत्सव साजरी केली.

महाराष्ट्रासह देशात आणि परदेशात ही ता.19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साह साजरी केली जाते. घनसावंगी तालुक्यातील लिंबी येथील धिरजसिंह तौर हे व्यवसायानिमित्त लंडन येथे स्थायिक आहेत. त्यांनी लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशची स्थापना केली आहे. या छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशचे हे दुसरे वर्ष असून सोमवारी (ता. 19) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. लंडनमधील डबल ट्री बाय हिल्टन मार्बल आर्च हॅाटेल मधील सभागृहात भारतीय व्यावसायिकांनी आणि विद्यार्थांनी एकत्र येऊन शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.

तसेच लंडनमधील मार्बल आर्च परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीबद्दल रस्त्यावर रॅली देखिल काढण्यात आली. लंडनमध्ये शिवजयंती साजरी करण्याचे हे दुसरे वर्ष आहे. धिरजसिंह तौर, तुषार मौले, स्वप्निल गावडे, सागर मुझमुले, सारंग तेजंकर व संज्योत भगवानकर यांनी शिवजयंतीसाठी पुढाकार घेतला.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मागील दोन वर्षांपासून आम्ही लंडनमध्ये साजरी करत आहेत. लंडन येथे व्यवसायासाठी आलेल्या भारतीयांना एकत्र आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशची स्थापना केली आहे. येथे भारतीय विद्यार्थ्यांच्या व व्यवसायिकांच्या हितासाठी सामाजिक चळवळ देखील सुरू केली आहे. भारतातून लंडनमध्ये शिक्षण अथवा नोकरीसाठी येणाऱ्या भारतीयांसाठी हक्काचे संघटन मिळाले आहे.

- धिरजसिंह तौर, अध्यक्ष, छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएश, लंडन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT