Latur News 
मराठवाडा

लातूरात एक दिवसाचा जनता कर्फ्यू, रविवार ठरतोय शांततेचा दिवस

सुशांत सांगवे

लातूर : शहरातील औषधांची दुकाने व रुग्णालय वगळता इतर सर्व दुकाने रविवारी (ता.१७) बंद ठेवण्याच्या निर्णयाला लातूरकरांनी पाठिंबा दिल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाटाची स्थिती पाहायला मिळाली. यानिमित्ताने शहरात जनता संचारबंदी समान स्थिती एक दिवसासाठी तयार झाली होती. पण, टाळेबंदी-चारमध्ये रविवारी सर्व व्यवहार बंद असणार की नाही, याकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.


कोरोनाचा संसर्ग रोखता यावा म्हणून टाळेबंदी-तीनमध्ये शहरातील सर्व दुकाने रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. केवळ औषधांची दुकाने आणि रूग्णालये यांना यातून सुट देण्यात आली होती. त्यामुळे शहरात दहा मे रोजी कडकडीत बंद पाहायला मिळाला. तिच स्थिती आजही रविवारी (ता.१७) पाहायला मिळाली. किराणा दुकाने, भाजी विक्री, फळ विक्री यासह शहरातील सर्व दुकाने एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आली. त्यामुळे बहुतांश नागरिक घरातून बाहेर पडले नाहीत. परिणामी, रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट पसरला होता.


शहरात गेल्या काही दिवसांत रात्रीच्या वेळी ढगाळ वातावरण तर दिवसा कडक उन्ह पहायला मिळत आहे. तरीसुद्धा दुपारच्या वेळी गंजगोलाईसारख्या भागात नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. शहरातील इतर रस्त्यांवरही वाहनांची आणि माणसांची वर्दळ होती. पण, हे सर्व रस्ते रविवारी ओस पडले होते. शहरातील प्रमुख चौकात बॅरिकेड्‌स लावून रस्ते अडविण्यात आले होते. पोलिस ये-जा करण्याची विचारपूस करत होते. दरम्यान, टाळेबंदी-चारमध्ये कोणकोणते नवे नियम लागू होतात, याकडे अनेक लातूरकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT