jarange patil beed meet up flower rain maratha reservation kunbi caste certificate Sakal
मराठवाडा

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांच्या फेरीला बीडमध्ये सुरुवात; निर्णायक इशारा सभेत काय बोलणार

हेलीकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार

दत्ता देशमुख : सकाळ वृत्तसेवा

Beed News : मनोज जरांगे पाटील यांची आज शनिवारी येथे होत असलेल्या निर्णायक इशारा सभेत ते काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची शहरातून फेरी निघाली आहे. त्यांच्यावर हेलिकॉप्टरसह २०१ जेसीबींमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, यासाठी दोन वेळा उपोषणे केली. दुसऱ्यांदा केलेल्या उपोषणानंतर सरकारने मागीतलेली व श्री. जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत २४ डिसेंबरला संपत आहे.

त्यामुळे बीडमध्ये होत असलेल्या सभेला निर्णायक इशारा सभा नाव देण्यात आले आहे. सभेची संयोजकांनी जय्यत तयारी केली आहे. शंभर एकरांवर तयार केलेल्या मैदानाला पाटील मैदान असे नामकरण करण्यात आले आहे.

सभेसाठी मनोज जरांगे पाटील शुक्रवारी रात्रीच जिल्ह्यात दाखल झाले आहेत. सभेची मागच्या १० दिवसांपासून जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत आहे. शहरात सर्वत्र कमानी, बॅनर व भगवे झेंडे लागले आहेत.

दरम्यान, सभेच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांच्या शहरातून फेरीला सुरुवात झाली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करुन फेरी सुरु झाली आहे. त्यानंतर सुभाष रोडवर आलेल्या फेरीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याला अभिवादन केले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालाही अभिवादन करण्यात आले.

या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सभेवेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हेलिकॉप्टरसह २०१ जेसीबींमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सभेत मनोज जरांगे पाटील आता काय निर्णायक भूमिका मांडणार याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२ कोटींची रोकड, ६ कोटींचे दागिने अन्...; काँग्रेस आमदाराकडे आढळलं घबाड, जप्त केलेल्या मुद्देमालाचा आकडा वाचून व्हाल थक्क

"माझ्या मुलाला वाचवा मी..." मुलाच्या जन्मावेळेस ढसाढसा रडू लागला गोविंदा; "गर्भलिंग निदान चाचणी.."

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Latest Marathi News Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

SCROLL FOR NEXT