MLA Kapil Patil sakal
मराठवाडा

MLA Kapil Patil : जेडीयूच्या नॅशनल जनरल सेक्रेटरीपदी आमदार कपिल पाटील यांची फेरनिवड

जनता दल (यूनाइटेड) च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सूत्र पुन्हा घेतल्यानंतर देशाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नवीन राष्ट्रीय कार्यकरिणी निवड करण्यात आली.

संजय हेगडे

तिसंगी - जनता दल (यूनाइटेड) च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सूत्र पुन्हा घेतल्यानंतर देशाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नवीन राष्ट्रीय कार्यकरिणी निवड करण्यात आली. आमदार कपिल पाटील यांच्याकडे नॅशनल जनरल सेक्रेटरी पदाची जबाबदारी पुन्हा देण्यात आली आहे.

नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत सर्वानुमते नीतीश कुमार यांना जेडीयूच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा विराजमान होण्याची विनंती केली होती. त्यानुसार ती सूत्र हाती घेतल्यानंतर नीतीश कुमार यांनी संघटनात्मक पातळीवर बदल केले आहेत. नवे सहकारी निवडले आहेत. त्यात महाराष्ट्रातून आमदार कपिल पाटील यांची फेरनिवड झाल्याने राज्यातील समाजवादी जनता परिवारात आनंदाचे वातावरण आहे.

समाजवादी विचारांचा झेंडा खांद्यावर घेऊन कपिल पाटील गेली चार दशकं सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. सलग 18 वर्ष महाराष्ट्र विधान परिषदेत एकमेव समाजवादी आमदार आहेत. हिंद मजदूर किसान पंचायतेचे ते राज्य अध्यक्ष आहेत.

धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या विचारांशी त्यांची निष्ठा अढळ आहे. या विचारांशी ते कधीही तडजोड करत नाहीत. शेतकरी, कष्टकरी, वंचित, दलित, अल्पसंख्य, विद्यार्थी आणि शिक्षण घटकांच्या प्रश्नांसाठी ते आयुष्यभर झटत आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT