संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

43 लाखांचे दागिने लंपास, दाेन भामटे अटकेत

सकाळ वृत्तसेवा

बीड - मुंबईच्या व्यापाऱ्याची दीड किलो सोन्याच्या दागिन्यांची बॅग (किंमत 43 लाख रुपये) लुटणाऱ्या आणि तीन वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या दोन चोरट्यांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (ता. 14) रात्री शहरातील राजुरी वेसजवळील अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर अटक केली. 


अनंत सीताराम डिकुळे (वय 28), शरद सीताराम डिकुळे (29, दोघे रा. घोटी, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी बार्शी पोलिसांना तीन वर्षे गुंगारा दिला. 

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे 2016 मध्ये मुंबईतील एक सराफा व्यापारी कामानिमित्त आले होते. तेथील बसस्थानाकातून त्यांच्याकडील 43 लाख रुपयांची दीड किलो सोन्याच्या दागिन्यांची बॅग तिघांनी हिसका मारून लंपास केली होती. याप्रकरणी बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर एकास अटक करून दागिनेही हस्तगत केले होते. मात्र, अनंत डिकुळे व शरद डिकुळे हे दोघे भाऊ फरारी होते. बार्शी पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी तीन वर्षे शर्थीचे प्रयत्न केले; परंतु ते ठिकाण बदलून वास्तव्य करीत. त्यांनी काही काळ पनवेललाही मुक्काम ठोकला.

दरम्यान, अनंत डिकुळे व शरद डिकुळे शनिवारी बीडला आल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना बेड्या ठोकल्या. या दोघांना बार्शी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक भारत राऊत यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT