जवान मोहिते 
मराठवाडा

जवान जीजाभाऊ मोहितेचा पठाणकोट येथे मृत्यू; परभणी जिल्ह्यावर शोककळा

पठाणकोट येथील वातावरणामुळे त्यांची तब्येत बिघडली त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण मागील तीन चार दिवसापूर्वी त्यांची प्रकृती आणखीनच खालावली त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.

जगदीश जोगदंड

पूर्णा ( जिल्हा परभणी ) : महागाव (ता. पूर्णा) येथील भारतीय हवाईदलात पठाणकोट येथे कर्तव्यावर असलेल्या जिजाभाऊ किशनराव मोहिते (वय २६ ) या सैनिकाचे गुरुवारी (ता. २७ ) निधन झाले असून तेथील हवामानाशी सामना करताना त्यांची तब्येत बिघडली व त्यातच त्यांना वीरमरण आले. या घटनेमुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

आई गंगासागर व वडिल किशनराव यांचा जिजाभाऊ हा एकुलता एक मुलगा होता. जीजाभाऊ किशनराव मोहिते (वय २६ ) स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन भारतीय हवाई दलात सेवेत दाखल झाला होता. त्यांना दोन महिन्याची चिमुकली आहे. मागील वर्षी नांदेड जिल्ह्यातील मार्कंड या गावात त्यांचा भाग्यश्री यांच्यासोबत विवाह झाला होता. त्यांचे इयत्ता पहिले ते सातवीचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले होते. इयत्ता आठवी ते दहावीचे शिक्षण खाजगी शाळेत झाले होते. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पालम, परभणी येथे घेत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी केली. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन त्यांची हवाई दलात निवड झाली होती. पठाणकोट येथील वातावरणामुळे त्यांची तब्येत बिघडली त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण मागील तीन चार दिवसापूर्वी त्यांची प्रकृती आणखीनच खालावली त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यातच त्यांची गुरुवारी ( ता. २७) सायंकाळी प्राणज्योत मावळवली.

हेही वाचा -

जीजाभाऊ मोहिते यांचे पार्थिव महागावात केव्हा दाखल होणार या बाबतची माहिती भारतीय सैन्य दलाने जिल्हा प्रशासनाला दिली नाही. पठाणकोट येथे अखेरची मानवंदना देवून पार्थिव विमानाने हवाईदलाच्या दिल्ली स्थित मुख्यालयात आणल्या जाणार आहे तेथे मानवंदना देवून पार्थीव हैद्राबाद येथे आणल्यानंतर तेथून मुळगावी महागाव येथे अंत्यसंस्कारासाठी रवाना होणार असल्याची माहिती वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना दिल्याची माहिती मिळाली आहे. उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील व तहसीलदार पल्लवी टेमकर हे वरिष्ठ अधिकारी व गावकऱ्यांशी संपर्क साधून आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोशल मीडियाचा निष्पक्ष न्यायप्रक्रियेला धोका; सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण; व्यक्त केली गंभीर चिंता, काय म्हणाले?

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Pune Crime: चाेरट्यांचा तब्बल २८ तोळे सोन्यावर डल्ला; आंबेगाव तालुक्यातील घटना, घरात काेणी नसल्याने साधला डाव!

Ayurvedic Tips for Oral Health: आयुर्वेदात सांगितलेल्या या सवयी फक्त दाताचं आरोग्यच नाही, तर पचनही परफेक्ट करतात; आजच फॉलो करा

Satara ZP: कायद्याचे रक्षक की सत्तेचे साधक! सातारा झेडपी अध्‍यक्ष निवडीवेळी झालेल्‍या ‘पाॅवर प्‍ले’चे पडसाद; पोलिसांच्या भूमिकेवर संशय..

SCROLL FOR NEXT