file photo 
मराठवाडा

जिंतूर : वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यास कोरोनाची लागण; वर्षभरात चार अधिकारी, सहा कर्मचारी पॉझिटिव्ह

राजाभाऊ नगरकर

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : शहरातील पोलिस ठाण्यासह उपविभागीय पोलिस अधीकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला असून मंगळवारी (ता. ३०) उपविभागातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्थानिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली. मागील वर्षभरात जिंतूर पोलिस ठाणे व उपविभागीय कार्यालयातील चार अधिकारी आणि सहा कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले आहेत.

कोवीड १९ विषाणूच्या दुसऱ्या लाटेत जिंतूर तालुक्यात कोरोना बधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून 'फ्रंट लाईन कोरोना योद्धा' म्हणून ओळखल्या जाणारे पोलिस अधिकारी व कर्मचारीही कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. मागील वर्षभरापासून जिंतूर पोलिस ठाण्यातील चार वरीष्ठ पोलिस अधिकारी, दोन महिला व दोन पुरुष कर्मचारी आणि उपविभागीय पोलिस अधीकारी कार्यालयातील दोन पुरुष कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले होते. तर कोरोनाने तालुक्यातील एका पोलिसाचा नुकताच बळी घेतल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली.

मंगळवारी (ता. ३०) पोलिस ठाण्यात घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजंन चाचणी शिबिरात उपविभागतील ३२ वर्षीय वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गृहरक्षक दलातील एक कर्मचारी यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शिबिरात दुपारपर्यंत ठाण्यात एकूण ६३ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजंन व आरटीपीसीआरद्वारे चाचण्या घेण्यात आल्या अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
राजाभाऊ नगरकर

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT