st bus accident sakal
मराठवाडा

ST Bus Accident : जिंतूर-सोलापूर एसटीचा अपघात; २१ प्रवासी जखमी

जिंतूर येथील वळणरस्त्यावर जिंतूर-सोलापूर एसटी बस पुलावरून खाली कोसळून झालेल्या झालेल्या अपघातात २१ प्रवासी जखमी झाले.

राजाभाऊ नगरकर

जिंतूर - येथील वळणरस्त्यावर जिंतूर-सोलापूर एसटी बस पुलावरून खाली कोसळून झालेल्या झालेल्या अपघातात २१ प्रवासी जखमी झाले. पैकी बाराजण गंभीर आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मात्र बसचे बरेच नुकसान झाले आहे. सदरची दुर्घटना बुधवारी (ता. २०) सकाळी साडेआठच्या दरम्यान जिंतूरपासून चार किलोमीटरवर जालना महामार्गावर घडली. दुपारी उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती.

येथील आगाराची बस एसटी बस (क्रमांक एमएच१४, बीटी २१७०) बुधवारी सकाळी रोजच्या वेळेप्रमाणे पाथरी-माजलगाव मार्गे सोलापूरकडे निघाल्यावर काही वेळातच शहरापासून काही अंतरावर अकोली शिवारात पुलाच्या वळणरस्त्यावर चालक रंगनाथ शेळके यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस पलट्या घेऊन सुमारे २५-३० खाली नदीपात्रात कोसळून अपघात झाला.

यावेळी बसमध्ये वाहक, चालक यांच्यासह ४२ प्रवासी होते. पैकी वाहक निलेश देशमुख सह २१ प्रवासी जखमी झाले. यात जिंतूर, सेनगांव, पाथरी वाशिम तालुक्यातील तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांचा समावेश आहे.

अपघात झाल्याचा आवाज व प्रवाशांच्या आरडाओरड्यामुळे जवळपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना अपघातग्रस्त बसमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत शासकीय रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथील प्रथमोपचारानंतर गंभीर रुग्णांना परभणी येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकिरण चांडगे व वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन काळे यांनी सांगितले.

अपघाताचे सर्वत्र पसरल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी, महामंडळाचे अधिकारी यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट देऊन चौकशी केली. आरटीओनेसुध्दा भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT