jalkot jalkot
मराठवाडा

धक्कादायक! लग्नानंतर हळद फिटण्यापूर्वीच तरुणाने केली आत्महत्या

हळद फिटण्यापूर्वीच शुभमने जगाचा निरोप घेतल्याने त्याच्या नववधूसह कुटुंबावर शोककळा पसरली आहे

शिवशंकर काळे

शुभमने आत्महत्येपूर्वी लिहिलेली दोन पानांची चिठ्ठी सापडली. आपल्या मृत्यूशी आई, वडील, भाऊ आणि मित्र अशा कुणाचा संबंध नसल्याचा आशय आहे

जळकोट (लातूर): येथे आठ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. १२) सकाळी उघडकीस आली. शुभम रामलिंग मठपती (वय २७) असे मृताचे नाव आहे. हळद फिटण्यापूर्वीच शुभमने जगाचा निरोप घेतल्याने त्याच्या नववधूसह कुटुंबावर शोककळा पसरली आहे. लग्नानंतरची पहिली नागपंचमी असल्याने शुभमची पत्नी माहेरी गेली होती. गुरुवारी सकाळी त्याला झोपेतून उठविण्याचा त्याचा मोठा भाऊ प्रदीप हा त्याच्या खोलीकडे गेला. पण, शुभम खोलीत दिसला नाही. त्यामुळे त्याने आजूबाजूला पाहिले. दरम्यान, शुभमने गळफास घेतल्याचे त्याला दिसले. या धक्क्याने प्रदीप चक्कर येऊन जाग्यावर कोसळला. दरम्यान, कुटुंबातील इतर सदस्यांनी धाव घेतली अन् एकच टाहो फोडला. ज्या घरातून आठ दिवसांपूर्वी वाजत्रींचे मंगल सूर ऐकू येत होते त्याच घरातून दुःखाचा आकांत ऐकला मिळाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कर्जामुळे उचलले टोकाचे पाऊल?

शुभमची शहरातच पानटपरी आहे. शिवाय त्याच्या नावे दोन एकर शेती आहे. लॉकडाउनमुळे त्याचा पानटपरीचा व्यवसाय मधल्या काही काळात ठप्प झाला होता. दरम्यान, त्याने शेतीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज घेतले होते. त्यातच आता पावसाने उघडीप दिल्याने पीक कोमेजत होते. त्यामुळे शुभमने व्यथित होऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लिहिली दोन पानांची चिठ्ठी

शुभमने आत्महत्येपूर्वी लिहिलेली दोन पानांची चिठ्ठी सापडली. आपल्या मृत्यूशी आई, वडील, भाऊ आणि मित्र अशा कुणाचा संबंध नसल्याचा आशय आहे. दरम्यान, बुधवारी रात्री त्याने देशमुख वाड्यासमोरील लिंबाच्या झाड्याखालील ओट्यावर बसून मित्रांशी गप्पा केल्या होत्या. त्या मित्रांचा त्याने चिठ्ठीत उल्लेख करून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT