file photo 
मराठवाडा

कळमनुरीत चोरट्यांनी एकाच रात्री पाच दुकाने फोडली; ५२ हजाराचा ऐवज केला लंपास

संजय कापसे

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : कळमनूरी हिंगोली मार्गावर असलेल्या पेट्रोल पंप परिसरात शुक्रवार (ता. २६)  रात्री चोरट्यांनी पाच ठिकाणी शटरचे वाकवून नगदी रकमेसह सिमेंट व हरभऱ्याचे पोते व मोटर मेकॅनिकलच्या दुकानातील साहित्य असा ५२ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. एकाच रात्री चोरट्यांनी या परिसरात हात साफ केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पेट्रोल पंप परिसरातील श्री. क्षिरसागर यांच्या गोदामाच्या मागच्या बाजूने चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी दहा पोते हरभरे किंमत २४ हजार रुपये लांबविले. गोदामाच्या समोरच्या बाजूला असलेल्या मोटर मेकॅनिकल दुरुस्ती या दुकानाचा आतील दरवाजा तोडून चोरट्यांनी या दुकानांमधील नगदी तीन हजार रुपये व २० रिंग पाने असे साहित्य लांबवले. त्यानंतर या चोरट्यांनी समोरच्या बाजूला असलेल्या दुधाधारी बांधकाम साहित्य विक्रीच्या दुकानाचे शटरचा कडी कोंडा तोडून दुकानांमधील सिमेंटची १९ पोते किंमत सात हजार चारशे रुपये लांबविले.

त्यानंतर या चोरट्यांनी बाजूलाच असलेल्या किसन तांबारे यांच्या इलेक्ट्रिकल टू व्हीलर या दुकानाचा कडी कोंडा तोडला मात्र चोरट्यांना याठिकाणी हाताला काही लागले नाही. त्यानंतर या चोरट्यांनी आपला मोर्चा विश्रामगृहासमोर असलेल्या नळ फिटिंग व साहित्य विक्रीच्या दुकानाकडे वळवला याठिकाणी शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानांमधील १८ हजार रुपये पळविले.

हा सर्व घटनाक्रम रात्री सुरु असताना चोरट्यांना कुठलाही अडथळा आला नाही. त्यामुळे चोरी झाल्याचा सर्व प्रकार शनिवार सकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, अंकुश शेळके, सूर्यकांत भारशंकर, प्रशांत शिंदे, यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी योगेश दूधे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT