Kamal Santosh Bondre
Kamal Santosh Bondre  sakal
मराठवाडा

देवगांव येथील शेतकरी महिलेने संत सेवालाल महाराजांच्या मंदिरासाठी जागा दिली दान

मुनाफ शेख

आडूळ : सामाजिक बांधिलकी म्हणून पैठण तालुक्यातील देवगांव येथील कमल संतोष बोन्द्रे या शेतकरी महिलेने आडूळ बु. पैठण शिवारातील त्यांच्या मालकीची २ गुंठे जमिन देवगांव तांडयावर संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरासाठी विना मोबदला दान दिली आहे.

पैठण तालुक्यातील देवगांव तांडा येथे यापूर्वी संत सेवालाल महाराज यांचे मंदिर नव्हते तसेच बंजारा समाजाची सुद्धा याठिकाणी भव्य मंदिर व्हावे अशी इच्छा होती. समस्या होती ती फक्त जागेची.

तांडयावरिल ग्रामस्थांची दररोजची तळमळ पाहून तसेच आपण तांड्यावरील बंजारा समाजासाठी काही तरी करावे या उद्देशाने देवगांव येथील कमल संतोष बोन्द्रे या शेतकरी महिलेने त्यांच्या आडूळ बु. शिवारातील गट क्र ३८३ मधील त्यांच्या मालकी व ताब्यातील २ गुंठे जमीन विना मोबदला मंदिरासाठी दान दिली आहे.

यामुळे येथील ग्रामस्थांची आता मागणी दूर झाली असून थोड्याच दिवसात मंदिराचे बांधकाम सुरु होणार आहे. आर सी सी मध्ये सदरिल मंदिराचे पक्के बांधकाम होणार असल्याने आडूळ ते देवगांव तांडा रस्त्यावर हे भव्य मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. ग्रामस्थांची दररोजची दर्शनासाठी होणारी पायपीठ थांबल्याने तांड्यावरील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करून सदरिल शेतकरी महिलेचे आभार मानले आहेत.

सध्याच्या युगात कोणीही कोणाला १ फूटभर सुद्धा मालकीची जागा मोफत देत नाही परंतु सामान्य कुटुंबातील शेतकरी महिलेने बंजारा समाजातील देवगांव तांड्यावरील ग्रामस्थांची दररोजची तळमळ पाहून तसेच बंजारा समाजासाठी काही तरी करावे या उद्देशाने कमल बोन्द्रे या महिलेने संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरासाठी त्यांच्या मालकीची जागा दान दिल्याने या महिलेचे सर्वत्र स्वागत होत आहे.संत सेवालाल महाराजांचे तालुक्यातील दुसरे मंदिर देवगांव तांडा येथे उभारले जाणार आहे.

देवगांव तांडा येथे यापूर्वी संत सेवालाल महाराज यांचे मंदिर नव्हते तसेच बंजारा समाजातील नागरिकांची तळमळ पाहुन धार्मिक कामात आपलाही सहभाग असावा या प्रेरणेने आम्ही पति - पत्नीने हा निर्णय घेऊन हि जागा मंदिरासाठी मोफत दान दिली आहे.कमल संतोष बोन्द्रे (शेतकरी महिला)

छायाचिञ ओळ

देवगाव तांडा ता.पैठण येथील बंजारा समाजाच्या नागरीकांसाठी संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरासाठी हिच जागा कमल बोंद्रे यांनी दान दिली आहे (छायाचिञ मुनाफ शेख)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: तुरुंगातून बाहेत येताच केजरीवालांचं मोदींना थेट आव्हान! उद्या घेणार पत्रकार परिषद

Chhattisgarh Naxalite : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; सहा नक्षलवाद्यांचा खात्मा

Ketaki Chitale : केतकी चितळेची ठाकरेंना उद्देशून वादग्रस्त पोस्ट; म्हणाली, लाज कशी वाटत नाही...

GT vs CSK IPL 2024 : गुजरातने सीएसकेचे वाढवले टेन्शन; जाता जाता दिला पराभवाचा धक्का

Uddhav Thackeray : ''मोदींनी डोळा मारलाय, पण मी जाणार नाही'', उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना चिमटा

SCROLL FOR NEXT