Kamgar Sahitya Sammelan is fixed in Latur
Kamgar Sahitya Sammelan is fixed in Latur 
मराठवाडा

कामगार साहित्य संमेलनावर अखेर शिक्कामोर्तब

सुशांत सांगवे

लातूर : कामगारांचे प्रश्‍न मांडण्यासाठी आणि प्रश्‍न मांडणाऱ्या लेखकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी कामगार साहित्य संमेलन घेण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य सरकारचा कामगार कल्याण विभाग आणि मराठवाडा साहित्य परिषद यांच्या वतीने हे संमेलन निलंगा येथे २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. राज्यभरातील कामगारांबरोबरच अनेक लेखकांना यात सहभागी करून घेतले जाणार आहे.  

गेल्या काही दिवसांपासून कामगार साहित्य संमेलनाच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे ‘कामगार मंत्र्यांच्या गावातच कामगार संमेलन’ असे वृत्त ‘सकाळ’च्या १७ जुलैच्या अंकात सर्वप्रथम प्रसिद्ध झाले. या पाश्‍वभूमीवर परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील हे सोमवारी लातूर भेटीवर आले होते. कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या सोबत आयोजित बैठकीत संमेलनावर शिक्कामोर्तब केले जाणार होते. पण संभाजी पाटील यांना इतर कामकाजामुळे अचानक मुंबईला जावे लागले. त्यामुळे त्यांच्या वतीने कामगार कल्याण विभागातर्फे संमेलनाचे निमंत्रण ठाले-पाटील यांना देण्यात अाले. ते निमंत्रण स्वीकारल्याचे ठाले-पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

ठाले-पाटील म्हणाले, ‘‘हे संमेलन दिवाळीनंतर होईल. ते दोन दिवसांचे घ्यायचे की तीन, हे अद्याप ठरले नाही. मात्र, दोन दिवसांचे घ्यायचे ठरले तर २२ आणि २३ नोव्हेंबर दरम्यान होईल. तीन दिवसांचे घ्यायचे ठरले तर २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्याचा निर्णय घेतला अाहे. हे संमेलन राज्यव्यापी असेल. त्यामुळे राज्यभरातील कामगार अाणि कामगारांच्या प्रश्‍नांवर, त्यांच्या रोजच्या जगण्यावर लेखन करणारे अनेक लेखक यात सहभागी होतील. कामगारांचे प्रश्‍नही यात मांडले जातील. कामगारांचे प्रश्‍न जाणून घेणारे नवे लेखक तयार व्हावेत, याचाही या संमेलनात विचार केला जाणार आहे.’’

मराठवाडा संमेलन डिसेंबरमध्ये -
मराठवाडा साहित्य परिषदेचे आगामी मराठवाडा साहित्य संमेलन उदगीरमध्ये घेण्याचा अंतिम निर्णय नुकताच झाला आहे. त्यामुळे उदगीर शाखेलाही ठाले-पाटील यांनी भेट दिली. या वेळी शाखेचे अध्यक्ष रामचंद्र तिरूके यांनी त्यांचे स्वागत केले. हे संमेलन डिसेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा जानेवारी महिन्याच्या सुरवातीस घेतले जाईल. या संमेलनाबरोबरच कामगार साहित्य संमेलनातील कार्यक्रमाची रूपरेषा लवकरच तयार केली जाईल, असेही ठाले-पाटील यांनी सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT