Sharad Rathod sakal
मराठवाडा

Kannad News : अपहरणाच्या प्रकरणातील शाळकरी मुलगा सापडला बोरगावला..! पोलिसांनी लावला अल्पावधीतच तपास

वडील मोबाईल देत नाही म्हणून मुलाने धरले हॉटेलमध्ये काम.

सकाळ वृत्तसेवा

कन्नड - चिंचखेडा तांडा, तालुका कन्नड येथील आठवीत शिकणारा मुलगा शरद पुनमचंद राठोड (वय-१३) याचे अपहरण झाले. अशी फिर्याद मुलाच्या वडिलांनी (ता. १५) कन्नड शहर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी अवघ्या 24 तासात मुलाचा छडा लावून (ता. १६) मुलाला शोधले. व आई-वडिलांच्या ताब्यात दिले.

या संदर्भात कन्नड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी सांगितले की, कन्नड शहर पोलीस ठाण्यामध्ये पूनमचंद मोहन राठोड राहणार चिंचखेडा तांडा यांनी फिर्याद दिली की, माझा मुलगा शरद पूनमचंद राठोड (वय-१३) हा कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयात आठवीत शिक्षण घेतो.

हा मुलगा (ता‌. 6) रोजी घरातून कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयात लोखंडी पेटीसह शाळेत व वस्तीगृहात जातो, म्हणून सांगून निघून गेला‌ त्यानंतर तो त्या वस्तीगृहात आलाच नाही. अशी माहिती वस्तीगृहाचे अधिक्षक संतोष जाधव यांनी मुलाच्या वडिलांना दिली. हे ऐकून मुलाच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ (ता. 15) कन्नड शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली.

मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद दिल्याने कन्नड शहर पोलीस ठाण्यामध्ये कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे फिरवली. सोशल मीडियावर व खबर्या मार्फत माहिती मागवली. माहिती प्रसारित झाल्याबरोबर सदरील मुलगा गल्लेबोरगाव येथील एका हॉटेलमध्ये कामाला असल्याचे आढळून आले.

पोलीस कॉन्स्टेबल दिनेश खेडकर, होमगार्ड उस्मान शेख, पोलीस मित्र सुजित राठोड यांनी तात्काळ बोरगाव येथून मुलाला ताब्यात घेतले‌ चौकशी केली असता धक्कादायक माहिती हाती आली. सदरील मुलगा हा आठवीत शिकत असून या मुलाला मोबाईल घ्यायचा होता. परंतु वडील शेती काम करत असल्याने आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वडिलांनी मुलास मोबाईल देण्यास असमर्थता व्यक्त केली.

त्यामुळे या मुलाने कोणालाही न सांगता वस्तीगृहात (ता .६) फक्त पेटी ठेवली आणि तिथून गल्लेबोरगाव गाठले. एका हॉटेलमध्ये मी अनाथ असून मला काम द्या अशी विनंती केली. तेव्हापासून तो मोबाईल साठी पैसे गोळा करण्यासाठी कामाला लागला. ‌सदरील मुलास कन्नड शहर पोलीस ठाण्यात आणून त्याच्या वडीलांच्या ताब्यात दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

मालिकेत एकमेकांच्या तालावर नाचणाऱ्या सायली आणि प्रियाने चक्क कोळीगीतावर लगावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल

Gas Cylinder Scam : ‘LPG सिलेंडर हवा आहे का?’ अशा प्रकारच्या 'या' 5 व्हॉट्सॲप मेसेजपासून सावध; एका क्लिकने बँक खाते होऊ शकते रिकामे

Latest Marathi News Live Update : ठाण्याची हवा बिघडली 25 हून जास्त हॉटस्पॉट..

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

SCROLL FOR NEXT