photo 
मराठवाडा

कपालभातीमुळे आजार पळतात दूर

राजेश दारव्हेकर

हिंगोली: निरोगी जीवन जगण्यासाठी व्यायामाला विशेष महत्त्व आहे. यात अनेक जण चालणे, धावणे यासह विविध व्यायाम करतात. योग अभ्यासातील प्राणायमाचा राजा माणला जाणारा कपालभातीमुळे शरीरातील अनेक आजार नाहीसे होत असल्याचे योग शिक्षक व साधक सांगत आहेत.

निरोगी जीवन जगण्यासाठी व्यायामाला विशेष महत्त्व असल्याने अनेक जण सकाळी फिरण्याला प्राधान्य देतात. रस्‍त्‍याने किंवा एखाद्या प्रांगणात चालतात तर काही जण धावतात. हिंगोली शहरातील आदर्श महाविद्यालय, रेल्‍वेस्‍थानक, गायत्री मंदिर, एनटीसी, पोलिस कवायत मैदान, जिल्‍हा परिषद कन्या शाळा आदी ठिकाणच्या मैदानावर सकाळ व सायंकाळच्या वेळी व्यायामासाठी गर्दी होत आहे. शहरात काही दिवसांपासून योगाअभ्यासाचे वर्ग मोठ्या प्रमाणावर चालत आहेत. 

शहरात ठिकठिकाणी योगवर्ग

शहरातील विद्यानगर, सरस्‍वतीनगर, रिसालाबाजार, एनटीसी, देवडानगर, सुराणानगर, गंगानगर यासह विविध ठिकाणी योगाचे वर्ग सुरू आहेत. प्रत्‍येक वर्गात मोठ्या संख्येने साधक योग शिक्षकाकडून योगाभ्यास करीत आहेत. पहाटे पाच ते सकाळी सात वाजेपर्यंत असे दोन तास येथे विविध आसने करीत आहेत. येथे प्राणायमातील राजा म्‍हणून ओळखल्या जाणाऱ्या कपालभाती प्राणायमाचे महत्त्व सांगून त्‍याचे प्रात्यक्षिक योग शिक्षक देत आहेत. 

कपाभातीमुळे साधक आत्मनिर्भर होतो.

प्रा. बी. टी. राठोड, सुनील मुळे, उमेश तोष्णीवाल यांनी कपालभातीबद्दल माहिती देताना सांगितले की, ‘कपालभातीकडे आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते, ते कुबड्यांशिवाय पळू लागलेले पाहावयास मिळत आहेत. कपाभातीमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयंपूर्ण होतो. कपालभातीने हार्टमधले ब्लॉकेजेस पहिल्या दिवसांपासून उघडू लागतात. ते १५ दिवसांत पूर्ण उघडतात. तेही कोणतेही औषध न घेता.’ कपालभाती करणाऱ्याच्या हृदयाची कार्यक्षमता वाढते. हृदयाची कार्यक्षमता वाढविणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही.
 

कपालभातीने शरीरात ऊर्जा निर्माण होते

 कपालभाती करणाऱ्याचं हृदय कधीच बंद पडत नाही. कपालभाती केल्याने शरीरांतर्गत आणि शरीरावरील कोणत्याही प्रकारची गाठ डिझॉल्व्ह होते. कपालभातीने शरीरात ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे गाठी विरघळतात. तसेच वाढलेलं कोलेस्टेरोल कमी होते. इएसआर, युरिक एसिड, एसजीओ, एसजीपीटी, क्रिएटेनिन, टीएसएच, हार्मोन्स, प्रोलेक्टिन पातळी सामान्य होऊ लागते. हिमोग्लोबिन एका महिन्यात बारा टक्‍क्यांपर्यंत पोचते. हिमोग्लोबिन एका वर्षात २६ ते १८ पर्यंत जाते. महिलांचे हिमोग्लोबिन १६ व पुरुषांचे १८ असायल पाहिजे. ते कपालभातीमुळे शक्‍य होत असल्याचे प्रा. राठोड यांनी सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC CAPF Success Story: एक एकर शेती, शेतमजुरी अन् जिद्दीच्या जोरावर UPSC CAPF मध्ये २७९ वा क्रमांक; प्रवीण स्वामींची यशोगाथा..

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Kas Plateau Flower Festival : कास पठारावरील फुले पाहण्यासाठी आता 200 रुपये शुल्क; पठारावर जाण्यापूर्वी जाणून घ्या Online Booking ची सोपी पद्धत

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

SCROLL FOR NEXT