हिंगोली - जिल्ह्यातील सोडेगाव येथील कयाधु नदीच्या पुलावरून पाणी वाहत असून वीस गावांचा संपर्क तुटला आहे. Kayadhu River, Hingoli
मराठवाडा

Hingoli Rain : कयाधूच्या पुलावरुन पाणी,वीस गावांचा संपर्क तुटला

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात (Hingoli) मागील आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. मंगळवारी (ता.२८) पहाटेपासुन संततधार पाऊस सुरू आहे. आज सुर्यदर्शन देखील झाले नाही. या पावसामुळे सोडेगाव (ता. कळमनुरी) (Kalamnuri) येथून वाहणाऱ्या कयाधु नदीला आलेल्या पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने या मार्गावरील वीस गावांचा संपर्क तुटला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. तो अद्यापही सुरुच आहे. मंगळवारी भल्यापहाटेपासून संततधार सुरू झालेला पाऊस (Rain In Hingoli) सुरुच आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहराजवळुन वाहणाऱ्या कयाधु नदीला (Kayadhu River) पुर आला आहे. तसेच जिल्ह्यातुन वाहणारी पैनगंगा नदी, आसना नदी दुथडी भरून वाहत आहे.

इतरही नदी, ओढ्याना पुर आला आहे. कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव गावाजवळून वाहणाऱ्या कयाधु नदीचे पाणी पुलावरून जात असल्याने उमरा फाटा ते बोल्डा फाटा जाणारा रस्ता बंद झाला आहे. या मार्गावर येणाऱ्या वीस ते पंचवीस गावांचा संपर्क तुटला आहे. यासह वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथे नदीचे पाणी गावात शिरले आहे. पावसाने सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणी केलेले सोयाबीन पिक पाण्यात तरंगत आहे. तर कापूस, तुर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हा पाऊस हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ व सेनगाव तालुक्यात सर्वदुर सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असुन शहरातील रस्त्यावर शुकशुकाट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माझ्या तोंडात शिव्या येतायत... कुंभमेळ्यासाठी झाडं तोडणाऱ्या सरकारला सयाजी शिंदेंनी विचारला जाब; आवाज उठवणाऱ्याला दाबलं जातंय...

Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द होणार? ५० टक्क्यांवरील आरक्षण ‘ट्रिपल टेस्ट’च्या कचाट्यात!

Latest Marathi News Live Update : डोंगराळे चिमुरडी हत्या प्रकरणानंतर मालेगावात तणाव वाढला

Viral Video: मुलाच्या स्कूल बॅगमध्ये लंच बॉक्स ऐवजी नोटांचे बंडल, पाहून आईला धक्का; सत्य समजल्यावर तरळले आनंदाश्रू, हृदयस्पर्शी व्हिडिओ

Ashes 2025 : नाद करती काय! स्टार्कने मोडलं इंग्लंडचं कंबरडं, 14 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच केला 'असा' पराक्रम

SCROLL FOR NEXT