मराठवाडा मुक्तिसंग्राम
मराठवाडा मुक्तिसंग्राम sakal
मराठवाडा

मराठवाडा मुक्तिसंग्रामात किल्लारीचे भरीव योगदान

विश्वनाथ गुंजोटे

किल्लारी : मराठवाडा मुक्तिसंग्रामात किल्लारी येथील स्वातंत्र्यसेनानी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. पंचावन्नपेक्षा जास्त स्वातंत्र्यसेनानींनी जिवाची कसलीही पर्वा न करता मुक्तिसंग्रामात सहभाग घेतला होता.

संपूर्ण मराठवाड्यावर निजामाचे राज्य होते. ते झुगारून भारतीय स्वातंत्र्यात विलीन होण्यासाठी हे सेनानी कायम धडपडत राहिले. या मुक्तिसंग्रामात किल्लारी येथील काहींनी उघड आंदोलने केली. रजाकारांचा या भागातील जनतेवर, महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू होता. त्यांचा बीमोड करण्यासाठी अनेकांनी भूमिगत राहून, गनिमी काव्याने लढत विजय मिळविला. या लढ्यात अनेकांना गुलबर्गा येथील तुरुंगात डांबण्यात आले होते. तर काहींना उस्मानाबादच्या जेलमध्ये डांबून ठेवले होते. तेव्हाच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील किल्लारी हे जिद्दीने भाग घेतलेले स्वातंत्र्यसेनानींचे गाव आहे.

त्यामुळेच मराठवाडा मुक्तिसंग्रामातील किल्लारीचे योगदान मोठे आहे. संपूर्ण भारत देश स्वतंत्र होऊनही मराठवाडा निजामाच्या आधिपत्याखाली होता. निजामशाही मोडीत काढत भारतात विलीन होण्यासाठी येथील सत्याग्रही गावात महात्मा गांधींचा फोटो, झेंडा घेऊन घोषणा देत फिरत असत. येथील रावसाहेब पाटील यांच्या गढीवर जाऊन तेथे यांची नोंद करून कामाला लागत. अनेक सेनानींना निजाम व रजाकारांनी याठिकाणी डांबून ठेवले होते. त्यांच्या या पराक्रमामुळे भारत सरकारला निजामशाहीच्या ताब्यातील हा भाग भारतात विलीन करण्यात मोठे सहकार्य मिळाले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी दाळिंबच्या वाकड्या पुलात सत्याग्रही सेनानी माधवराव बिराजदार, राम बळीराम भोसले, महादाप्पा दलाल यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यादव बाबाराव पाटीलही यात शहीद झाले होते. शिवलिंग दलाल, बळी बाबळसुरे बचावले होते.

अनेक शूरवीरांनी मुक्तिसंग्रामात मोलाची कामगिरी केली. त्यांच्या स्मरणार्थ गावांमध्ये स्मारक बांधलेले होते. भूकंपानंतरही नवीन पुनर्वसनमध्ये हे स्मारक नव्याने उभारण्यात आले आहे. त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी ग्रामपंचायत व स्वातंत्र्यसेनानी यांच्या नातेवाइकांकडून ध्वजवंदन करून श्रद्धांजली वाहिली जाते. तर भारतीय पोलिस आणि मिलिटरीची कार्यवाही सुरू होताच रजाकार बैलगाड्या भरून येथील लुटलेले सोने, पैसा मौल्यवान वस्तू घेऊन पळ काढू लागले. जाताना ओझ्यामुळे बैलगाडीचे चाक मोडले होते. एवढी मोठी लूट किल्लारीतून त्यावेळी झाल्याचे जाणकार सांगतात.

किल्लारीतील स्वातंत्र्यसेनानी

विठ्ठलराव रामराव भोसले, बळी ग्याना भोसले, भीमा बाजीराव भोसले, माधवराव मोरे, रामचंद्र वाडीकर, भगवान पोतदार, गुरुपदाप्पा बिराजदार, राम पेमा भोसले, पोतदार, हिराचंद रामा भोसले, व्यंकट पोतदार, मनमंत बालकुंदे, शिवा बालकुंदे, केशव बिराजदार, गणपती गावकरे, शंकर मुळजे, नामदेव बाबळसुरे, शामराव हेळंबे, किसन बाळापुरे, मल्लाप्पा परसाळगे, माधवराव परसाळगे, लक्ष्मण कांबळे, अण्णाराव मुरारी भोसले, शिवलिंग दलाल, बळी बाबळसुरे, पार्श्वनाथ मोतीचंद कोटे, रतनचंद कोटे, शामराव उमाटे, पांडुरंग माळी, बसू मडोळे, विरुपक्ष सावळगे, राम सगर, गंगाराम नरसू भोसले, राम भोसले, यादव बाबाराव पाटील, सिद्राम बिराजदार, विश्वनाथ जोगी, गुरुलिंग रामा कुंभार, भगवान मडोळे आदी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT