केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे  sakal
मराठवाडा

Parbhani : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा ; किसान रेल्वे परभणीतून जाणार

भाजप सरकार सत्तेत येण्याआधी महाराष्ट्रातील रेल्वे विकासाला केवळ एक हजार १०० कोटी रुपये दिले जात होते.

सकाळ वृत्तसेवा

परभणी : मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांतील प्रमुख व्यवसाय हा शेती असल्याने शेतकऱ्यांचा शेतीमाल इतर राज्यातील बाजारपेठेत नेण्यासाठी मराठवाड्यातून किसान रेल सुरू केली जाईल. याचा फायदा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी रविवारी (ता.२५) दिले.

भारतीय जनता पक्षाच्या महाजनसंपर्क अभियानांतर्गत रविवारी (ता. २५) येथील रेणुका मंगल कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. कार्यक्रमास आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, महानगराध्यक्ष आनंद भरोसे, राजेश देशपांडे,मोहन कुलकर्णी, डॉ. उमेश देशमुख, संतोष मुरकुटे, विठ्ठलराव रबदडे, सुरेश भुमरे, बाळासाहेब भालेराव, सुप्रिया कुलकर्णी, विलास बाबर, संजय शेळके, सुनील देशमुख, डॉ. कांबळे, डॉ. विद्या चौधरी आदींची उपस्थिती होती.

श्री. दानवे म्हणाले, ‘‘भाजप सरकार सत्तेत येण्याआधी महाराष्ट्रातील रेल्वे विकासाला केवळ एक हजार १०० कोटी रुपये दिले जात होते. परंतु, २०१४ नंतर महाराष्ट्रातील रेल्वेविकासाच्या कामासाठी तब्बल १२ हजार कोटी रुपये दिल्या जात आहेत. केंद्रात भाजपची सत्ता येण्याआधी देशातील ४० टक्के लोकांना बॅँकेचे दरवाजेही माहीत नव्हते.

परंतु, सर्वांचे बॅँक खाते काढल्यानंतर या ४० टक्के लोकांची पत बॅँकेत निर्माण झाली आहे. या बॅँक खात्यामुळे आता विविध अनुदानाची रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यावर येत आहे. पूर्वी १०० रुपये सरकारने दिले तर लाभार्थीला केवळ १५ रुपये मिळत असते. आता पूर्णच्या पूर्ण रक्कम त्याच्या खात्यावर जमा होत आहे. कोरोना संसर्गाच्या काळात अनेक बलाढ्य देशात मृत्यूचे तांडव सुरू झाले होते.

परंतु, केवळ भारतात सर्वांत कमी मृत्यू झाले आहेत. त्याचे एकमेव कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच घेतलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांमुळे आपण सर्वच जन सुरक्षित राहिलो. देशात सुबकता आणण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. आता राज्या-राज्यात व जिल्ह्यात-जिल्ह्यांत भाजप सर्वशक्तिमान राजकीय पक्ष म्हणून समोर आलेला आहे. त्यामुळे या संधीचे कार्यकर्त्यांनी सोने केले पाहिजे. देशात सत्ता, राज्यात

शिवसेनेसोबत सत्ता असताना गोरगरीब वंचिताची कामे करण्याचे ध्येय भाजप सरकारने उराशी बाळगले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही आपल्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचून भाजप सरकारच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीचा यशस्वी लेखाजोखा जनतेपर्यंत नेला पाहिजे’’, असे आवाहन त्यांनी केले.

स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करू

जिल्ह्यात भाजपला चांगले वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिनाभरापासून भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते घरा-घरांत जाऊन लोकांशी संपर्क साधत आहेत. केंद्र सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात केलेली विकास कामे, आणलेल्या योजना व जनहिताची कामे जनतेपर्यंत पोचविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे दांडगा जनसंपर्क झाला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निश्चित यश मिळवू, असे आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या.

किसान रेले व वंदे भारत रेल्वेची मागणी

मराठवाड्याचा रेल्वे राज्यमंत्री असल्याने मराठवाड्यातील जिल्ह्यांना झुकते माप देण्यात यावे, अशी मागणी आमदार बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, महानगराध्यक्ष आनंद भरोसे आणि विलास बाबर यांनी त्यांच्या भाषणातून केली. परभणी जिल्ह्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय हा शेती असल्याने या भागातून किसान रेल्वे व वंदे भारत रेल्वे सुरू करावी अशी अग्रही मागणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT