Kotwal recruitment cancelled criminal cases will filed against copy jalna marathi news sakal
मराठवाडा

Kotwal Recruitment ...तर कोतवाल परीक्षा होणार रद्द; सात कॉपीबहाद्दर सापडेनात, पुणे सायबर पोलिसांकडून जालन्यात तपास

कोतवाल परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

जालना : कोतवाल परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात आली होती. याशिवाय अजून सात ते आठ परीक्षार्थींनी परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याचा डाटा सायबर पोलिसांकडे तपासादरम्यान उपलब्ध झाला आहे.

त्यामुळे पुढील पंधरा ते वीस दिवसांमध्ये त्या सात-आठ कॉपीबहाद्दरांना अटक झाली नाही, तर कोतवाल परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी शुक्रवारी (ता.२७) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे उमेदवारांवर पुन्हा परीक्षा देण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

राज्यात यापूर्वी पोलिस भरती, आरोग्य भरती परीक्षेत पेपर फुटीचे प्रकार घडले होते. या प्रकारामध्ये जालना जिल्ह्यातील काही संशयितांची नावे पुढे आली होते. त्या पाठोपाठ ता. सात ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील ६९ जागांसाठी कोतवाल भरती परीक्षा घेण्यात आली होती.

शहरातील १९ परीक्षा केंद्रावर सुमारे साडेपाच हजार परीक्षार्थींनी परीक्षा दिली होती. मात्र, परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये शहरातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र व सरस्वती भुवन प्रशाला येथील परीक्षा केंद्रावरून आठ कॉपीबहाद्दरांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे कानातील छोटे ब्लू-टूथ आढळून आले होते. हे ब्लू-टूथ एकाच सर्व्हरशी कनेक्ट असल्याचे तपास पुढे आले आहे.

शिवाय याच सर्व्हरशी अजून सात ते आठ ब्लू-टूथ कनेक्ट असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासामध्ये समोर आले आहे. या कोतवाल भरती परीक्षेतील कॉपी बहाद्दरांच्या तपासासाठी पुणे सायबर पोलिस जालन्यात येऊन गेले आहेत. मात्र, अद्याप त्या आठ कॉपीबहाद्दरांचा पोलिसांना तपास लागलेला नाही. त्यामुळे पुढील पंधरा ते वीस दिवसांमध्ये हे कॉपीबहाद्दर हाती न लागल्यास कोतवाल परीक्षा रद्द केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी स्पष्ट केले आहे.

उमेदवारांचा होणार हिरमोड

सध्या शासकीय नोकरीच्या संधी खूप कमी आहेत. त्यामुळे मिळेल ती शासकीय नोकरी करण्याची सुशिक्षित तरुणांची तयारी आहे. कोतवाल भरतीसाठी सुमारे साडेपाच हजार परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. यात अनेक उच्च पदवीधर उमेदवारांचा देखील समावेश होता. मात्र, कोतवाल भरती परीक्षेत गैरव्यवहार करून उत्तीर्ण होण्याचा फंडा वापरणाऱ्यांमुळे या उमेदवारांचाही आता हिरमोड होणार आहे.

त्यामुळे निकाल ठेवला होता राखून

कोतवाल परीक्षेत कॉपी करणारे अटक केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी कोतवाल परीक्षेचे पेपर तपासणी आणि निकाल राखून ठेवले आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. परंतु, या प्रकरणात अटके व्यतिरिक्त अजून सात ते आठ कॉपीबहाद्दर असल्याचे तपास पुढे आले असून ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे ही परीक्षा रद्द होऊ शकते.

कोतवाल परीक्षेचा निकाल पोलिसांचा तपास पूर्ण होईपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. या तपास कामी पुणे सायबर पोलिसही जालन्यात येऊन गेले आहेत. पोलिसांचा तपास सुरू आहे. या प्रकरणात अटकेतील आठ जणांशिवाय अजून सात ते आठ जणांनी कॉपी केल्याचे धागेदोरे मिळाले आहेत. परंतु, ते अद्याप पोलिसांना सापडले नाहीत. जर पुढील पंधरा ते वीस दिवसांमध्ये त्यांना अटक झाली नाही, तर कोतवाल परीक्षा रद्द करण्याचा विचार केला जाईल.

— डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हाधिकारी, जालना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT