Shankarrao Chavan Government Hospital Nanded  
मराठवाडा

प्रसूतिगृहाशेजारी जमिनीवर उपचार, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील चित्र

दीपक सावते

नांदेड - सध्या निवडणूक काळात सरकारकडून आरोग्य सुविधेचा दिंरोडा पिटल्या जात आहे. आयुष्यमान भारत, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या मुद्दयांवर मते मागितलीजात आहेत. एवढेच नाही तर गरजू रुग्णांना चांगले उपचार देऊ, असे आश्वासनही दिले जात आहे. पण, प्रत्यक्षात शासकीय रुग्णालयांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव आहे. नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात तर प्रसूतिगृहाजवळ रुग्णांना झोपवून चक्क फरशीवर उपचार केले जात आहेत. 

सध्या जिल्ह्यात साथीच्या आजारांची साथ आहे. त्यामुळे रुग्णालयांत गर्दी होत आहे. पण, बहुतांश गरजूंना खासगी रुग्णालयात उपचार घेणे शक्‍य नाही. त्यामुळे ते शासकीय रुग्णालयात  जात आहेत. असे असताना येथील शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात सुविधांचा वानवा आहे. येथे रुग्णांना प्रसूतिगृहांशेजारी फरशीवर झोपवून सलाइन चढविले जात आहे. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाइकांमधून प्रशासनाप्रति रोष व्यक्त होत आहे. 
  
येते थंडी भरून 
सध्या ढगाळ वातावरण आहे. अधून-मधून अवेळी पाऊसही पडत आहे. त्यामुळे गारवा निर्माण झाला आहे. अशा स्थितीत रुग्णांना चक्क फरशीवर झोपवून सलाइन चढवले जात आहे. फरशी थंड असल्याने आणि त्यातच वरून सलाइन जात असल्याने रुग्णांना थंडी भरून येत आहे. 
 
खाटा वाढवाव्या 
या रुग्णालयात खांटाची संख्या अपुरी आहे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देऊन खांटांची संख्या वाढवावी, अशी मागणी रुग्ण आणि नातेवाइकांमधून
होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma तयारीला लागला.... ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणारच! Photo पाहून चाहते खूश; सर्फराजलाही दिलेत बॅटिंगचे धडे

Latest Marathi News Updates : मुंबई गुन्हे शाखेची कारवाई : अवैध कॉलसेंटरचा भांडाफोड, 93 जणांविरुद्ध गुन्हा

Kirkitwadi News : शिक्षणासाठी धोक्याची वाट! खडकवासला पुलावर पाणी साचून जीव धोक्यात

Pune News : शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरसावले पोलिस दल; नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबविणार, शस्त्रसज्ज पोलिसांचा पहारा

Accident News : दीड कोटी खर्चूनही रस्ता जीवघेणा: नामपूरमध्ये कंटेनरच्या धडकेत वृद्ध महिला ठार

SCROLL FOR NEXT